28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeटेक्नॉलॉजीजिओ 5G : फ्री ट्रायल ऑफर कशी मिळेल ते जाणून घ्या; वापरुन...

जिओ 5G : फ्री ट्रायल ऑफर कशी मिळेल ते जाणून घ्या; वापरुन पाहा अन् स्पीडचा फरक अनुभवा !

सध्याच्या 4G नेटवर्कपेक्षा 5G नेटवर्क अधिक उत्तम आणि 10 पट वेगवान इंटरनेट स्पीड देते, असा दावा केला जातो. सध्या जिओ वेलकम ऑफरचा भाग म्हणून 1Gbps पर्यंत स्पीड ऑफर करते. जिओ फाईव्ह जी डेटा प्लॅन भारतात लॉन्च; किंमत आणि इतर तपशील जाणून घ्या...

भारतात फाईव्ह जी प्रत्यक्ष वापरण्याची प्रतीक्षा आता संपली आहे. जिओ 5G डेटा प्लॅन भारतात लॉन्च झाला आहे. (Reliance JIO 5G Data Plan) जिओ 5G फ्री ट्रायल ऑफर कशी मिळेल ते जाणून घ्या; वापरुन पाहा अन् स्पीडचा फरक अनुभवा. रिलायन्स जिओने तशी सुविधा आपल्या ग्राहकांना देऊ केली आहे. तुम्हाला जिओची फाईव्ह जी ट्रायल कशी घेता येईल ते आपण बघूया …

जिओ फाईव्ह जी डेटा प्लॅनची किंमत आणि इतर तपशील तसेच फ्री ट्रायल ऑफर ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला यातून देणार आहोत. (JIO 5G Free Trial Offer) त्यासाठी तुम्ही आधी जिओचे ग्राहक असणे गरजेचे आहे. याशिवाय, तुमच्या मोबाईलमध्ये माय जिओ अॅप इन्स्टॉल केलेले असावे. माय जिओमध्ये ‘5G अपग्रेड’ हा नवीन सेक्शन जोडला गेला आहे. रिलायन्स जिओच्या ज्या ग्राहकांनी 239 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा प्रीपेड प्लॅन रिचार्ज केलेला आहे, त्यांना फाईव्ह जी ट्रायल सहज आणि मोफत मिळणार आहे. त्यासाठी कुठलाही अतिरिक्त पॅक खरेदी करण्याची अथवा इतर रिचार्जची गरज नाही.

ज्या लोकांकडे 239 पेक्षा कमी किमतीचा प्लॅन आहे, त्यांना 5G चा अनुभव घेता येत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी आता नवीन प्रीपेड प्लॅन उपलब्ध आहे. जिओने आधीपासून अस्तित्वात असलेल्या 61 रुपयांच्या डेटा व्हाऊचर प्लॅनवरच नवा फाईव्ह जी ट्रायल प्रीपेड प्लॅन ऑफर केला आहे. यात फाईव्ह जीचा 6GB डेटा मिळणार आहे. देशातील ज्या शहरांमध्ये फाईव्ह जी नेटवर्क सुविधा उपलब्ध आहे, त्या शहरात या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. 61 रुपयांचा ट्रायल फाईव्ह जी डेटा प्लॅन हा ज्यांनी 119, 149, 179, 199 किंवा 209 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज केला आहे, त्यांच्यासाठी आहे. आशा ग्राहकांचा सध्याचा प्रीपेड प्लॅन संपेपर्यंत 61 रुपयांचा ट्रायल फाईव्ह जी प्लॅन अॅक्टिव्ह राहील. रिलायन्स जिओ ग्राहक जे 239 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त प्रीपेड प्लॅनवर आहेत त्यांना अतिरिक्त पॅक खरेदी करण्याची गरज नाही. ते आपोआप माय जिओ फाईव्ह जी अपग्रेड करून ट्रायल घेऊ शकतात.

जर तुम्हाला जिओ फाईव्ह जी वेलकम ऑफर मिळाली नसेल, तर 61 रुपयांचा ट्रायल फाईव्ह जी डेटा प्लॅन खरेदी केल्यानंतरही तुम्हाला 5G सेवेचा अनुभव घेता येणार नाही. फाईव्ह जी सेवांसाठी तुमचा स्मार्टफोन 5G एनेबल्ड असावा किंवा त्याला मोबाइल उत्पादक कंपनीकडून 5G सपोर्ट अपडेट मिळालेले असावे. तुम्हाला रिलायन्स जिओचे 5G आमंत्रण मिळाल्यानंतर तुमच्या डिव्हाइसचे मोबाइल नेटवर्क सेटिंग 5G वर सेट करावे लागेल. माय जिओ अॅपमध्ये तुम्हाला 5G वेलकम ऑफर आमंत्रण तपासता येऊ शकेल. माय जिओमधील नोटिफिकेशन चेक करूनही तुम्ही ही ऑफर मिळाली की नाही ते पाहू शकता. सध्या तर माय जिओ होम पेजवरच ठळकपणे तुम्हाला ही ऑफर दिसू शकेल.

हे सुद्धा वाचा : 

भारतात कधी सुरू होणार BSNL 5G सेवा, वाचा सविस्तर

JIO New Offer : जिओच्या नव्या ऑफरमुळे ग्राहक आनंदी, आता वापरायला मिळणार 112GB डेटा

VI New Recharge Plan : वीआई देतंय रिचार्जसोबर मोफत हॉटस्टार अन् प्राईम व्हिडिओजची मेंबरशीप

सध्याच्या 4G नेटवर्कपेक्षा 5G नेटवर्क अधिक उत्तम आणि 10 पट वेगवान इंटरनेट स्पीड देते, असा दावा केला जातो. सध्या जिओ वेलकम ऑफरचा भाग म्हणून 1Gbps पर्यंत स्पीड ऑफर करते; परंतु नवीन 5G नेटवर्कची चाचणीसाठी जिओकडून अतिरिक्त डेटा मोफत दिला जात नाही. या 5G नेटवर्कची चाचणीत डेटा खूप वेगाने संपतो. एकदा तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर 5G सेटिंग करून ते सक्रिय केले की, तुमचा डेटा काही वेळातच संपेल. अनेकांना या चाचणीत नेटवर्क समस्या देखील जाणवत आहेत. त्यामुळे तुम्ही जर 5G ट्रायल ऑफर वापरण्याचा विचार करत असाल, तर बाहेर असताना ते मुळीच करू नका. कारण तुमच्या स्मार्टफोनमध्ये डेटा नसेल, तर जेवणासाठी पैसे भरण्यापासून ते कॅब बुक करण्यापर्यंत सारी कामे अडून पडू शकतात. आजकाल डेटा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे, घरी किंवा कार्यालयात असतानाच 5G ट्रायल ऑफर वापरुन पाहा.

माय जिओ अॅप डाऊनलोड करा 

Reliance JIO 5G Data Plan, JIO 5G Free Trial Offer, जिओ 5G फ्री ट्रायल ऑफर, जिओ फाईव्ह जी डेटा प्लॅन

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी