27 C
Mumbai
Sunday, March 19, 2023
घरमहाराष्ट्रचंद्रकांत दादा म्हणतात, एकही देव 'बॅचलर' नाही; मारुतीराया सविस्तर चर्चेसाठी भेट घेणार!

चंद्रकांत दादा म्हणतात, एकही देव ‘बॅचलर’ नाही; मारुतीराया सविस्तर चर्चेसाठी भेट घेणार!

जनतेच्या मूलभूत प्रश्नावर चर्चा करण्याऐवजी पुराणातील वांग्यांना फोडणी देण्यातच राजकारण्यांना रस दिसत आहे. पुरणकालिन अथवा ऐतिहासिक दाखले देत सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्यातील समस्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठीच वादग्रस्त वक्तव्ये राजकारण्यांकडून केली जात आहेत का? असा सवाल आता जनतादेखील विचारू लागली आहे. आपल्या वादग्रस्त विधानांसाठी सतत चर्चेत असलेले भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी आता देवांच्या विवाहितपणाचा दाखला देत प्रपंच करता करताही सर्व काही करता येते, असा मौलिक सल्ला दिला आहे.

ऐतिहासिक आणि पौराणिक विषयांवर सामाजिक प्रबोधन करण्याची राजकारण्यांमध्ये (Politics) जणू काही स्पर्धाच सुरु झाली आहे. मात्र, यामुळे सर्वसामान्यांचे प्रबोधन होण्यापेक्षा मनोरंजनच होत आहे. या समाज प्रबोधनकारांमध्ये आघाडीवर असलेले भारतीय जनता पक्षाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आपल्या वक्तव्याने पुन्हा एकदा विरोधकांच्या हाती आयते कोलीत दिले आहे. पुण्यामध्ये शुक्रवारी झालेल्या एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी आपला एकही देव अविवाहित (Bachelor) नसल्याचे विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांनी चंद्रकांत दादांच्या या वादग्रस्त विधानाची खिल्ली उडवली असून दादांच्या या टिपणीवर सविस्तर चर्चा करण्यासाठी साक्षात मारुतीराया (God Hanumaan) आता त्यांना भेटणार असल्याचे म्हंटले आहे. (Chandrakant Dada says, no god is a ‘bachelor’; Marutiraya will meet to discuss this issue!)

हे सुद्धा वाचा

भाजप नेते किरीट सोमय्या सोमवारी कोल्हापुरात; पत्रकार परिषदेत काय बोलणार ?

लालू प्रसाद यादव यांच्यावर रेल्वे भरती घोटाळा प्रकरणी खटला चालविण्यास गृहमंत्रालयाची परवानगी

‘लय भारी’चे व्यवस्थापकीय संपादक तुषार खरात यांना यशवंत रत्न पुरस्कार

 

वादग्रस्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत असलेले भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यावरून वाद ओढवून घेतला आहे. ते म्हणाले, “आपला एकही देव, आपले कुठलेही महापुरुष ‘बॅचलर’ नाही. संसार करून सगळं करता येते. सेवाही करता येते.” त्यांच्या या टिपणीवरून राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी पाटील यांची उपरोधिक शैलीत फिरकी घेतली आहे. “आपला एकही देव बॅचलर नाही असे म्हणताच चंद्रलोकात भुवया उंचावल्या आणि सगळ्यांनी मारुतीकडे पाहायला सुरुवात केली आणि मारुतीला चंद्रकांत पाटील ज्यांचे म्हणणे ऐकवले. मारुतीने निर्णय घेतला आहे की, लवकरच चंद्रकांत दादांची भेट घेऊन ते बॅचलर आहेत की नाही यावर सविस्तर चर्चा करणार आहे,” अशा शब्दांत आव्हाड यांनी पाटील यांची खिल्ली उडवली आहे. यावर आता चंद्रकांत दादा काय उत्तर देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील
आपला कुठलाही देव, आपले कुठलेही महापुरुष अविवाहित नाहीत. संसार करून सगळं करता येते. सेवाही करता येते, असे चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात म्हंटले आहे. ज्याचं रक्त हिरव्या किंवा निळ्या रंगाचं आहे असा जगात कुठलाही माणूस नाही. देवाने माणसाला बनविताना कुठलाही भेदभाव केलेला नाही. सगळ्यांना दोन कान, दोन डोळे, सामान शरीर दिले आहे. पुढे विज्ञानावर उपस्थितांचे प्रबोधन करताना चंद्रकांत पाटील म्हणले, “माणसाचा जन्म हा स्पर्मपासून होतो. स्पर्म कोणाला दिसत नाही. तो स्पर्म १०० किलोचा माणूस तयार करतो. त्या स्पर्मपासून माणूस निर्माण करणारा कोणीतरी आहे ना? सगळी माणसे त्याने बनवली आहेत.”

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी