33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीयएकनाथ शिंदेंच्या मुख्यपंत्रीपदामुळे आनंदी चेहरे कमी, दुःखी चेहऱ्यांचीच संख्या जास्त

एकनाथ शिंदेंच्या मुख्यपंत्रीपदामुळे आनंदी चेहरे कमी, दुःखी चेहऱ्यांचीच संख्या जास्त

टीम लय भारी

मुंबई : एक रिक्षावाला मुख्यमंत्रीपदावर पोहोचला, याचा महाराष्ट्रातील तमाम जनतेला आनंद व्हायला हवा. परंतु सामान्य जनतेपासून ते राजकीय क्षेत्रातील मातब्बर व्यक्तीपर्यंत जास्तीत जास्त चेहरे दुःखीच दिसत होते. शपथविधी सोहळ्यात खुद्द भाजपमधील तमाम नेत्यांचेही चेहरे पडलेले दिसत होते.एकनाथ शिंदे यांनी अनपेक्षितपणे उद्धव ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्रीपद ओरबाडले. दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणविसांच्या तोंडासमोर आलेला मुख्यमंत्रीपदाचा घास सुद्धा शिंदे यांनी बेमालूमपणे स्वतःच्या घशात घातला. त्यामुळे आपले सरकार येवून सुद्धा भाजपच्या नेत्यांचे, विशेषतः फडणवीस यांच्या समर्थकांचे चेहरे पडलेले दिसत होते.
एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांना हाताशी धरून देवेंद्र फडणवीस यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्याचे स्पष्ट झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी एकाच वेळी उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांना धोका देण्याचे काम केले. त्यामुळे शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांमध्ये नाराजी पसरली आहे.

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यामुळे शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्येही सल आहे. त्यामुळे राज्यातील प्रमुख चार पक्षांपैकी कुणालाच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याचा आनंद नाही.
एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटासह बंडखोरी करताना देशभर हिडीस प्रदर्शन केले. महाराष्ट्राच्या अब्रुची लक्तरे देशाच्या वेशीवर नेऊन टांगली गेली. त्यामुळे महाराष्ट्रातील सामान्य जनतेमध्ये एकनाथ शिंदेंच्या बंडाबाबत नाराजी होती.
अशातच उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरून महाराष्ट्रातील जनतेशी दोन वेळा संवाद साधला. हा संवाद ऐकल्यानंतर सामान्य जनतेमध्ये ठाकरे यांच्याविषयी सहानुभूतीची लाट निर्माण झाली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेले काम उत्कृष्ट होते. एकनाथ शिंदे व बंडखोरांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसल्याची भावना सामान्य जनतेमध्ये आहे.
एकनाथ शिंदे हे अभ्यासू नेते नाहीत. ते लोकप्रिय सुद्धा नाहीत. त्यांची चिमुटभर लोकप्रियता ही ठाण्यातील जनतेपुरतीच मर्यादीत आहे. त्यांनी राजकारणात येवून बराच मलिदा हडपला. त्यातून बंडखोर व अपक्ष आमदारांना स्वतःच्या खिशात ठेवले, अशी भावना महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या मनात निर्माण झाली आहे.एकनाथ शिंदे यांच्या रूपाने एका सामान्य व्यक्तीने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, पण त्याचे कौतुक कुणालाच नसल्याचे दिसत आहे.

हे सुध्दा वाचा : 

सामान्य माणूस ‘मुख्यमंत्री‘ पदी विराजमान झाला

मुख्यमंत्री पदावर विराजमान होत असतांना चेहरा मात्र चोरा सारखा

‘लय भारी’चे भाकीत ठरले खरे, एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सात दिवसांपूर्वीच प्रसिद्ध केली होती बातमी

नवेली कांबळे
नवेली कांबळेhttp://laybhari.in
Naveli Kamble is a reporter/ sub editor.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी