28 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeटॉप न्यूजCorona : महाराष्ट्रात 50 टक्के रुग्ण 'कोरोनामुक्त'! 

Corona : महाराष्ट्रात 50 टक्के रुग्ण ‘कोरोनामुक्त’! 

टीम लय भारी

मुंबई :  महाराष्ट्रातील  कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला  तरी सुध्दा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  मोठ्या प्रमाणात आहेत. ही राज्याच्या दृष्टीने दिलासादायक बाब आहे.  (6 जून) पर्यंत 82 हजार 968 वर पोहचला आहे (Total Corona Patient in Maharashtra). यापैकी आतापर्यंत 37 हजार 390 कोरोना रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात एकूण 42 हजार 600 कोरोना  रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. शनिवारी दिवसभरात 2 हजार 234 रुग्णांना घरी सोडण्यात आले.

राज्यात 47 शासकीय आणि 38 खासगी अशा एकूण 85 प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 5 लाख 37 हजार 124 नमुन्यांपैकी 82 हजार 968 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 5 लाख 46 हजार 566 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या महाराष्ट्रात संस्थात्मक क्वारंटाईनसाठी 75 हजार 741 खाटा उपलब्ध आहेत. यामध्ये सध्या 29 हजार 98 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

शनिवारी राज्यात 120 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय ठाण्यात 90 मृत्यू (मुंबई 58, ठाणे 10, उल्हासनगर 6, वसई विरार 1, भिवंडी 3, मीरा-भाईंदर 5, पालघर 1), नाशिक – 7 (नाशिक 5, मालेगाव 2), पुणे- 17 (पुणे 10, सातारा 5, सोलापूर 2), औरंगाबाद – 2 (औरंगाबाद मनपा 2), अकोला – 4 (अकोला मनपा 2, अमरावती 2) मृत्यू झाले. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 78 पुरुष, तर 42 महिला आहेत. या 120 मृत्यूंपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 53 रुग्ण आहेत, तर 47 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 20 जण 40 वर्षांखालील आहेत. या 120 रुग्णांपैकी 69 जणांमध्ये ( 57.5 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

मृत्यूंची संख्या आता 2 हजार 969 वर…++-

कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 2 हजार 969 झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूंपैकी 30 मृत्यू हे मागील 2 दिवसांतील आहेत, तर उर्वरित मृत्यू 3 मे ते 3 जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील 90 मृत्यूंपैकी मुंबई 53, मीरा भाईंदर – 5, भिवंडी – 3, ठाणे – 9, उल्हासनगर – 6 ,नवी मुंबई – 6, सातारा – 2, वसई विरार – 1, अमरावती – 1, औरंगाबाद – 1, मालेगाव – 1, नाशिक – 1, सोलापूर 1 असे मृत्यू आहेत.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट 3 हजार 603 झोन क्रियाशील आहेत. आज एकूण 18 हजार 422 सर्वेक्षण पथकांनी काम केले. त्यांनी 69.82 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी