31 C
Mumbai
Thursday, July 4, 2024
Homeटॉप न्यूजविराट कोहलीचा आणि टॉसचा ३६ चा आकडा, माजी क्रिकेटरची प्रतिक्रिया

विराट कोहलीचा आणि टॉसचा ३६ चा आकडा, माजी क्रिकेटरची प्रतिक्रिया

टीम लय भारी

भारताने अफगाणिस्तानला पराभूत केल्यानतंर आज होणाऱ्या स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यामध्ये मोठा विजय मिळवणं गरजेचे आहे. मात्र सध्या चर्चा आहे ती विराट कोहली आणि टॉससोबत व्यस्त असलेले त्याच्या कनेक्शनची. यंदाच्या आतापर्यंतच्या टी – २० वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला टॉस जिंकता आलेला नाही. तसेच या आधी ही कोहलीचा टॉससोबत ३६ चा आकडा असल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारी सांगतात (Aakash Chopra reaction to Virat’s toss related statistics).

विराटच्या या टॉस संबंधित आकडेवारीवर माजी क्रिकेटर आणि क्रिकेट समालोचक आकाश चोप्रा यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. एका युट्युब चॅनलशी संवाद साधताना आकाश चोप्रा याने भारताची स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात रणनीती कशी असावी. यामध्ये भारताचे टॉस जिंकणं महत्वाचं असल्याचं तो म्हणाला.

एकता कपूर, करण जोहर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित; सोमवारी होणार पुरस्कार प्रदान सोहळा

कीर्तनकार इंदुरीकर महाराज म्हणाले,मी तर लस घेतली नाही आणि घेणारही नाही

आकाशने विराट कोहलीचा टॉससोबत ३६ चा आकडा असल्याचं सांगत आकडेवारी समोर ठेवली. गेल्या ५० वर्षात हा सर्वात वाईट रेकॉर्ड असल्याचे आकाश या वेळी म्हणाला. ८ टी- २० सामन्यांमध्ये विराटनं भारताचे नेतृत्व केले आहे. पण या ८ पैकी फक्त एकाच सामन्यात विराट टॉस जिंकला आहे. त्याचबरोबर गेल्या ५० वर्षांमध्ये ज्या खेळाडूंनी किमान १०० सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. त्यात विराट कोहलीचा टॉस जिंकण्याचा रेकॉर्ड सर्वात वाईट आहे. असे आकाश चोप्रा म्हणाला.

‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या ‘नाजा’ या नव्या गाण्याचा टीझर रिलीज!

IND vs SCO Playing XIs: Will India play three spinners against Scotland?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी