25 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeटॉप न्यूजआशा भोसलेंनी वयाच्या 88 व्या वर्षी मराठी चित्रपटासाठी गायले गाणे

आशा भोसलेंनी वयाच्या 88 व्या वर्षी मराठी चित्रपटासाठी गायले गाणे

टीम लय भारी

मुंबई :  ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी उत्साहात मराठी चित्रपटांसाठी मंगळवारी गाणे गायले आहे. आशा भोसले यांनी त्यांच्या गोड आवाजात मराठी, हिंदी अशा अनेक भांषांमध्ये गाणी गाऊन कानसेनांना तृप्त केले आहे (Asha Bhosle for a Marathi film).

महेश टिळेकर दिग्दर्शित ‘हवाहवाई’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गाणे गायले असून त्यांचा आवाज श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेताना दिसत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने आशा भोसले यांनी बऱ्याच वर्षानंतर मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले आहे.

अभिनेता रजत बेदीच्या कारची पादचाऱ्याला धडक

अरूणिता कांजीलाल व पवनदीप राजन यांचा रोमँटिक व्हिडिओ व्हायरल…

पंकज पडघन यांनी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केले असून महेश टिळेकर यांनीच लिहिलेल्या “जगण्याची ही मजा घेऊया नव्याने, जाऊया पुढे पुढे साऱ्यांच्या साथीने दिशा नव्या वाटे हव्या, साद देती आता उडण्याची…’ असे शब्द असलेले गाणे आशा भोसले यांच्या सुमधूर आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आले आहे (Asha Bhosale melodious voice has been recorded).

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahesh Tilekar (@maheshtilekar)

 

आमिरचा लाल सिंग चड्डा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात…

Cancel crowd-pulling events, says Maharashtra CM Uddhav Thackeray, mum on new curbs

तसेच, ‘हवाहवाई’ या चित्रपटाची निर्मिती मराठी तारका अंतर्गत करण्यात आली असून विजय शिंदे यांनी निर्मितीपदाची धुरा सांभाळली आहे. दिनांक ८ सप्टेंबरला आशा भोसले या ८९ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी