29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeटॉप न्यूजनव्या कायद्यामुळे शेतकऱ्यांना फायदाच, काँग्रेस – राष्ट्रवादी लबाड : आशिष शेलार

नव्या कायद्यामुळे शेतकऱ्यांना फायदाच, काँग्रेस – राष्ट्रवादी लबाड : आशिष शेलार

टीम लय भारी

मुंबई :  संसदेत मंजूर झालेला नवा कायदा हा शेतकऱ्यांच्या हिताचाच आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस लबाड आहेत ( Ashish Shelar alleges, Congress NCP is liar ). त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला खरा मित्र समजून घ्यावा, अशी भावना ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे.

नव्या कायद्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही स्थानावरून हव्या त्या ठिकाणी शेतमालाची विक्री करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. हमीभाव यापुढेही दिला जाणार आहे. हे सगळे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच आहे ( Ashish Shelar said, Farm Bill is good for farmers )  तरीही नव्या कायद्याला विरोध केला जात असल्याची टीका ॲड. शेलार यांनी केली आहे. ट्विटरवरून शेलार यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

हे सुद्धा वाचा

खाकीत काम करणारे घटक समाजासाठी महत्त्वाचे : शरद पवार

Crucial farm reforms through, trail of anger, discord in House

महाराष्ट्रात भाजपचे सरकार सत्तेत असताना २०१७ मध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदान करण्याचा अधिकार दिला होता. त्यावेळी काँग्रेस – राष्ट्रवादीने या निर्णयाला विरोध केला, आणि सत्तेत येताच शेतकऱ्यांचा हा अधिकार काढून घेतल्याचे शेलार यांनी म्हटले आहे.

आपले राजकीय अड्डे उद्ध्वस्त होतील म्हणून लबाडीचे राजकारण कोण करत आहे. कृपया शेतकऱ्यांनो हे नीट समजून घ्या, असेही शेलार यांनी आवाहन केले आहे ( Ashish Shelar appealed to farmers ).

lay bhari
येथे क्लिक करा, व फेसबुक पेज लाईक करा

Mahavikas Aghadi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी