32 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमुंबईधक्कादायक : भिवंडीत इमारत कोसळली; ८ जणांचा मृत्यू, ३० - ४० जण...

धक्कादायक : भिवंडीत इमारत कोसळली; ८ जणांचा मृत्यू, ३० – ४० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

टीम लय भारी

मुंबई : भिवंडी येथे तीन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. यांत आठ जण मृत्यू झाला असून तब्बल ३० ते ४० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली आहे ( Building collapsed at Bhivandi, 8 dead ) .

ही घटना पहाटे ३.४० च्या सुमारास घडली आहे. ‘जिलानी’ असे नाव असलेली ही इमारत भिवंडी येथील पटेल कंपाऊंडमध्ये आहे. एनडीआरएफ व अग्निशमन दलाच्या जवानांनी मलबा हटविण्याचे काम सुरू केले आहे.

या इमारतीत एकूण ३१ कुटुंबे राहतात. सर्वजण झोपेत असतानाच पहाटे ३.४० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे सूत्रांनी सांगितले ( 31 families stayed in Jilani building at Bhivandi ) .

याबाबत स्थानिक खासदार कपिल पाटील यांनी सांगितले की, या घटनेबाबत महापालिका आयुक्तांशी मी चर्चा केली आहे. तिथे मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. ही इमारत १९८५ साली बांधली होती. धोकादायक स्थितीत असल्यामुळे इमारत रिकामी करण्याची नोटीस फेब्रुवारीमध्येच दिली होती ( MP Kapil Patil said, emergency work started at Bhivandi ).

प्रत्येक पावसाळ्यात भिवंडीमध्ये अशा घटना घडत असतात. त्यामुळे नागरिकांनीच स्वतःची काळजी घ्यायला पाहीजे, असेही कपिल पाटील यांनी आवाहन केले.

Mahavikas Aghadilay bhari

येथे क्लिक करा, व फेसबुक पेज लाईक करा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी