32 C
Mumbai
Monday, January 29, 2024
Homeटेक्नॉलॉजीचंद्रावर उतरण्यास चांद्रयान सज्ज; अवघे काही तास बाकी

चंद्रावर उतरण्यास चांद्रयान सज्ज; अवघे काही तास बाकी

चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लॅंडींग करणार आहे. ही लॅंडींग यशस्वी झाल्यास असे करणारा भारत पहिला देश ठरणार आहे.

सगळ्या भारतीयांचे लक्ष लागून राहिलेल्या चांद्रयान- ३ च्या मोहिमेचा आज निर्णायक टप्पा आहे. संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान चंद्रावर सॉफ्ट लॅंडींग करण्यास सज्ज असून चंद्रावर लँड करणारा भारत चौथा देश ठरणार आहे. याआधी अमेरिका, रशिया, चीन यांनी चंद्रावर यशस्वीपणे लॅंडींग केले आहे. विशेष म्हणजे इस्रोची ही मोहीम खूपच आगळीवेगली आणि ऐतीहासिक असणार आहे. कारण, चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लॅंडींग करणार आहे. ही लॅंडींग यशस्वी झाल्यास असे करणारा भारत पहिला देश ठरणार आहे. त्यामुळेच संपूर्ण जगाच्या नजरा आता चांद्रयानकडे वळल्या आहेत.

इस्रोने याआधी केलेल्या चांद्रयान मोहीमा या यशस्वी ठरल्या होत्या. यातील चांद्रयान १ मोहिमतुन चंद्रावर पानी असल्याचा ऐतीहासिक शोध लावण्यात आला होता. तसेच, चांद्रयान २ मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यात येणार होता. यासाठी चंद्राच्या कक्षेत भ्रमण करण्यासाठी ऑरबिटर, विक्रम नामक लँडर आणि प्रज्ञान नामक रोवर् पाठविले गेले होते. परंतु, शेवटच्या क्षणी संपर्क तुटल्यामुळे सॉफ्ट लॅंडींग करताना लँडर आणि रोवर क्रॅश झाले. तरीही, ऑरबिटर अजूनही चंद्राभोवती भ्रमण करीत काम करत असल्यामुळे चांद्रयान २ मोहिमेतुन काही प्रमाणात यश प्राप्त झाले.

हे ही वाचा 

मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रालयात हडपली दोन कार्यालये!

अखेर देवेंद्र फडणवीस होणार डॉक्टर; जपानच्या कोयासन विद्यापीठाने केली मानद डॉक्टरेटची घोषणा

मोठी बातमी : एकनाथ शिंदेंमुळे २ लाख कोटी गुंतवणुकीचा प्रकल्प खड्ड्यात, चूक दुरूस्त करण्यासाठी अजितदादांनी आज बोलाविली ‘जम्बो’ बैठक !

आता चांद्रयान ३ मोहिमेतून पुन्हा एकदा भारताचा झेंडा चंद्रावर फडकवण्यासाठी इस्रो सज्ज झाले आहे. सोमवारी, २१ ऑगस्ट ला चांद्रयान ३ च्या विक्रम लँडरने मागील ४ वर्षापासून चंद्राच्या कक्षेत भ्रमण करत असलेल्या चांद्रयान २ च्या ऑरबिटरशी संपर्क साधला आहे. यामुळे आता चांद्रयान ३ शी संपर्क करण्याचे काम इस्रो च्या वैज्ञानिकांना आणखी सोपे होणार आहे.

चंद्रावर १४ दिवसांचा १ दिवस तर १४ दिवसांची रात्र असते. लॅंडींग करण्याची तारीख आणि वेळ इस्रो च्या शास्त्रज्ञांनी मुदामहून २३ ऑगस्ट संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांची ठेवली आहे. कारण, यावेळी चंद्रावर सूर्योदय होणार असून चांद्रयान ३ वर वापरण्यात येणारी उपकरणे ही सौरऊर्जेवर चालणारी आहेत.

इस्रोचे शास्त्रज्ञ नीलेश देसाई यांनी चांद्रयान ३ च्या लॅंडींग बद्दल सांगितले की, “चंद्रावर उतरण्याच्या २ तास आधी आम्ही लांडेर आणि चंद्राच्या परिस्थितीचा आढावा घेऊ आणि त्यानुसारच लँडर चंद्रावर लँड करण्याबाबत निर्णय घेऊ. जर लँडर किंवा चंद्रावरची परिस्थिति सोयीस्कर नसेल तर लॅंडींगचा निर्णय आम्ही २७ ऑगस्ट पर्यंत पुढे ढकलू. पण त्याआधी आम्ही २३ ऑगस्टला लँड करण्याचा प्रयत्न करू.”

अवघ्या ६५० कोटी एवढ्या बजेट मध्ये पुन्हा एकदा मोठी कामगिरी करण्यासाठी इस्रो सज्ज असतानाच चांद्रयान ३ च्या यशासाठी सगळे भारतीय प्रार्थना करीत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी