30 C
Mumbai
Tuesday, June 18, 2024
Homeटॉप न्यूजकाँग्रेसच्या विधीमंडळ गटनेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड

काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : उद्या विधानसभेचे अधिवेशन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या पक्षाच्या विधानसभेतील गटनेतेपदाची निवड केली आहे. बाळासाहेब थोरात यांची या पदावर निवड करण्यात आली आहे. जुहू येथील जे. डब्ल्यू. मॅरिएट हॉटेलमध्ये सध्या काँग्रेसचे सगळे आमदार मुक्कामासाठी आहेत. याच ठिकाणी आज काँग्रेसच्या आमदारांनी बैठक घेतली. या बैठकीत बाळासाहेब थोरात यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक

उद्या, बुधवारी विधानसभेत बहुमताची चाचणी घेण्यात येणार आहे. या चाचणीच्या वेळी भाजप सरकारचा पराभव व्हायला हवा याबाबतची मोर्चेबांधणी करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक सुरू झाली आहे. भाजपकडून उद्या काय खेळ खेळले जातील, त्याचा अंदाज घेत तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून डावपेच आखले जात आहेत. विधानसभा अध्यक्ष आणि अजित पवार यांचे हत्यार भाजपकडून वापरले जाणार आहे. आणखीही काही हत्यारे ते आयत्यावेळी काढू शकतील. त्यावर तिन्ही पक्षांकडून काय करायचे यावर या पक्षांत खलबते सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हे सुद्धा वाचा

भाजप आमदारांना ‘या’ ठिकाणी दिलं जाणार कानमंत्र

भाजप बहुमत सिध्द करुन दाखवणार : चंद्रकांत पाटील

भाजपच्या हाती हंगामी विधानसभाध्यक्ष, अजितदादांचे हत्यार

‘महाविकास आघाडी 30 तासात नव्हे, 30 मिनिटांत बहुमत दाखवू शकते

मोठी बातमी : उद्या बहुमत सिद्ध करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, घोडेबाजार रोखण्यासाठी निकाल

‘राज्यपालांनी संविधानाचा खेळखंडोबा केला, संविधानाच्या बारा वाजवल्या’

राष्ट्रवादीच्या पक्षनेत्यांचा निर्णय विधानसभा अध्यक्षच घेतील : विधीमंडळ सचिव

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी