27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeटॉप न्यूजCoronavirus : जगभरात १७० देशांमधील ४,८१,२३० जणांना लागण; २१,२९३ हून अधिक मृत्यू

Coronavirus : जगभरात १७० देशांमधील ४,८१,२३० जणांना लागण; २१,२९३ हून अधिक मृत्यू

लय भारी टीम

नवी दिल्ली : कोरोनाने (Coronavirus) जगभरात थैमान घातले असून या विषाणूची लागण होऊन आतापर्यंत २१ हजार २९३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १७० देशांमधील चार लाख ८१ हजार २३० जणांना लागण झाल्याचे जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

स्पेनमध्ये २४ तासांत ६५५ मृत्यू
स्पेनमध्ये या विषाणूची लागण झाल्याने ४०८९ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये ६५५ जण मृत्युमुखी पडले आहेत. स्पेनमधील अधिकाऱ्यांनी बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीत १९ टक्क्यांची वाढ झाली आहे. सर्वाधिक मृत्यू इटलीमध्ये झाले आहेत.

युरोपमधील मृतांची संख्या १४ हजार ६४०
युरोपमध्ये कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या गुरुवारी दोन लाख ५० हजारांवर गेली असून इटली आणि स्पेनमध्ये त्यापैकी निम्म्याहून अधिक जणांचा समावेश आहे. युरोपला कोरोनाचा सर्वाधिक तडाखा बसला असून दोन लाख ५८ हजार ६८ जणांना त्याची लागण झाली असून, त्यापैकी १४ हजार ६४० जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये ७४ हजार ३८६, तर स्पेनमध्ये ५६ हजार १८८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

इराणमध्ये १५७ जण दगावले
इराणमध्ये गुरुवारी कोरोनाची लागण झाल्याने आणखी १५७ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या २२३४ वर पोहोचली आहे. गेल्या १४ तासांत आणखी २३८९ जणांना लागण झाल्याचे आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते कियानौश जहानपोर यांनी सांगितले. कोरोनाची लागण झालेल्यांची एकूण संख्या २९ हजार ४०६ झाली आहे. त्यांपैकी १० हजार ४५७ जण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

जर्मनीत १९८ मृत्यू
जर्मनीमध्ये ३६ हजार ५०८ जणांना कोरोनाची लागण झाली असून १९८ जणांचा मृत्यू झाला आहे, असे रॉबर्ट कोच संस्थेच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. फ्रान्समध्येही २५ हजार २३३ जणांना लागण झाली असून १३३१ जणांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी