33 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeटॉप न्यूजदेवेंद्र फडणवीस म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांनीच मला राजकारणाचे धडे दिले

देवेंद्र फडणवीस म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांनीच मला राजकारणाचे धडे दिले

मुंबई l  राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज वाढदिवस साजरा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, दुसरीकडे भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचीही जयंती साजरी केली जात आहे. राज्यभरातील नेते आणि कार्यकर्ते या दोन्ही नेत्यांच्या कार्याची आणि विचारांची पेरणी सोशल मीडियावर करताना दिसत आहेत.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis )यांनी आपल्या ट्विटरवरुन गोपीनाथ मुंडेंना अभिवादन केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन एक व्हिडिओ क्लीप शेअर केली आहे. त्यामध्ये, गोपीनाथ मुंडेंनीच माझ्यासारख्या सामान्य तरुणाला राजकारणाचे धडे दिले, विधानसभेत आणि विधानसभेबाहेर मी हे धडे घेतले, असे फडणवीस म्हणत आहेत.

एका छोट्याशा गावातून निघालेला हा तरुण, कुठल्याही राजकीय पाठबळाशिवाय, कुठल्याही पैसा, ताकद आणि संघटनेशिवाय पुढे निघाला. एकच गोष्ट मुंडेसाहेबांकडे होती, ती म्हणजे प्रचंड आत्मविश्वास आणि हिंमत. याच हिंमतीच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर या तरुणाने न्यूयॉर्कपर्यंत मजल मारली. न्यूयॉर्कच्या युएन जनरल असेम्बलीमध्ये त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले. त्यांचा हा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

गोपीनाथ मुंडेंनी मला एक राजकीय मंत्र दिला, संघर्ष करायला आम्ही जे शिकलो ते गोपीनाथरावांमुळेच शिकलो. गोपीनाथराव मला एकच गोष्ट सांगायचे. देवेंद्र… जीवनात मोठे व्हायचे असेल तर सत्तेशी समझोता करु नको, सत्तेशी संघर्ष कर. सत्तेशी समझोता करुन कोणालाही पुढे जाता येत नाही, मोठे होता येत नाही.

पण, सत्तेशी संघर्ष केल्यानंतर आपणास जीवनात मोठ होता येते. आज गोपीनाथराव प्रत्यक्ष रुपाने नसले तरी, त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठिशी आहे. कितीही संकटे आली तरी, संकटावर मात करायला आम्ही त्यांच्याकडूनच शिकलो आहोत, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी गोपीनाथ मुंडेंना अभिवादन केले आहे.

शिवसेनाला केले लक्ष्य
फडणवीस यांनी गोपीनाथ मुंडेंना अभिवादन करताना शिवसेना लक्ष्य केले आहे. सत्तेशी समझोता करुन कधीही मोठा होत नाही, सत्तेशी संघर्ष कर.. हा मंत्र त्यांनी मला दिला आहे, असे सांगत एकप्रकारे फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेलाच टोला लगावला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी