32 C
Mumbai
Monday, January 29, 2024
Homeजागतिकगाझा हॉस्पिटल हल्ल्यासाठी हमासच जबाबदार! इस्राईलने दिले पुरावे..

गाझा हॉस्पिटल हल्ल्यासाठी हमासच जबाबदार! इस्राईलने दिले पुरावे..

गाझामधील अल अहली हॉस्पिटल मध्ये झालेल्या रॉकेट हल्यात सुमारे 500 हुन अधिक जणांचा बळी गेला होता. हॉस्पिटलवर झालेल्या हल्ल्यानंतर जगभरातून इस्राईलवर टीका होत होती. पण, इस्राईल डीफेन्स फोर्सेस या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हे आरोप फेटाळून लावत, इस्राईलने हा हल्ला केला नसून पॅलेस्टाईन इस्लामिक जिहाद या दहशतवादी संघटनेने केल्याचा आरोप केला आहे. त्यासंबंधीचा एक विडिओ तसेच ऑडिओ क्लिप सोशल मिडियावर जारी करण्यात आला आहे. इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहु यांनी ट्विटरवर या हल्ल्याबाबत निषेध व्यक्त केला आहे. त्यात आपण हे कृत्य केले नसून दहशतवाद्यांनी केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

गाझामधील अल अहली हॉस्पिटलवर मंगळवारी, (19 ऑक्टोबर) झालेल्या रॉकेट हल्ल्यात 500 हुन अधिक लोक मृत्यूमुखी पडले होते. या भीषण हल्यानंतर हॉस्पिटलच्या इमारतीला मोठी आग लागली. ज्यामध्ये अनेकांचा होरपळून मृत्यू झाला. हल्यानंतर सोशल मिडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हीडियोज मधून हॉस्पिटल परिसरात मृतदेहांचा खच पडल्याचे दिसून आले. मृतांमध्ये लहान मुलांचादेखील समावेश होता. या घटनेनंतर, जगभरातून हॉस्पिटलवरील हल्याचा तीव्र निषेध करण्यात आला असून इस्राईल-हमास युद्धात निष्पाप नागरिकांचा नाहक बळी जात असल्याचे म्हंटले जात आहे.

बेंजामिन नेत्यानाहू यांची प्रतिक्रिया

इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहु यांनी ट्विटरवर हॉस्पिटल हल्ल्याबाबत निषेध व्यक्त केला असून आपण हे कृती केले नसून दहशतवाद्यांनी केली असल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, “संपूर्ण जगाला हे माहित असले पाहिजे की, गाझामधील क्रूर दहशतवाद्यांनी गाझामधील हॉस्पिटलवर हल्ला केला होता, इस्राईल डीफेन्स फोर्सेसने नाही. ज्यांनी आमच्या मुलांची निर्घृण हत्या केली ते आता स्वतःच्या मुलांचीही हत्या करत आहेत.”

“इस्राईल डीफेन्स फोर्सेस ऑपरेशनल सिस्टीमचे विश्लेषण असे सूचित करते की गाझामध्ये अतिरेक्यांनी रॉकेटचा एक बॅरेज डागला होता, ज्या वेळी तो मारला गेला तेव्हा गाझामधील अल अहली हॉस्पिटलच्या जवळून जात होता. आमच्या हातात असलेल्या अनेक स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीवरून असे सूचित होते की गाझामधील हॉस्पिटलमध्ये झालेल्या रॉकेट प्रक्षेपणासाठी इस्लामिक जिहाद जबाबदार आहे.” ते पुढे म्हणाले.

हे ही वाचा 

गाझा रुग्णालयातील 500 जीवांचे मारेकरी कोण?

गाझामधील लहान मुलांचा तरी विचार करा, इस्राइल-हमास युद्धावरुन सोनम झाली भावुक

युद्ध का थांबत नाही?

इस्राईल डीफेन्स फोर्सेसने दिले पुरावे

इस्राईल डीफेन्स फोर्सेस या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन इस्राईलने गाजामधील हॉस्पिटलवर केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. यासंबंधीत, त्यांनी अनेक पुरावे सादर केले असून हा हल्ला गाजामधील दहशतवाद्यांनी केला असल्याचे म्हंटले आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर त्यांनी एक ऑडिओ क्लिप टाकली असून त्यात हमासचे दोन दहशतवादी गाजामधील हॉस्पिटल हल्ल्याबद्दल बोलत असल्याचे स्पष्ट होत आहे. हॉस्पिटलवर पडलेले रॉकेट चुकीने फायर झाले असुंन ते इस्राईलचे नसून आपले आहे, असे पॅलेस्टाईन इस्लामिक जिहादचे दोन दहशतवादी एकमेकांशी बोलत असल्याचे ऐकू येत आहे.


यासोबतच, एक व्हीडियो फुटेजही जारी केला असून हॉस्पिटलजवळच्या पार्किंग परीसराचे हल्ल्यापूर्वीचे आणि नंतरची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी