31 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeटॉप न्यूजगोंदवलेकर महाराज मंदीर ट्रस्टकडून पीएम केअर फंडाला 50 लाख, सीएम फंडाला मात्र...

गोंदवलेकर महाराज मंदीर ट्रस्टकडून पीएम केअर फंडाला 50 लाख, सीएम फंडाला मात्र घंटा, तरीही निलम गोऱ्हेंचा ट्रस्टवर वरदहस्त !

टीम लय भारी

मुंबई : गोंदवलेकर महाराज मंदीराचे विश्वस्त जातीयवादी, भाजप – आरएसएस धार्जिणे असल्याचा आणखी एक ढळढळीत पुरावा ‘लय भारी’च्या हाती आला आहे ( Gondvlekar Maharaj trust reluctant for Covid center ).

मंदिराच्या विश्वस्तांनी गेल्या वर्षी तब्बल 50 लाख रुपयांची मदत पीएम केअर फंडाला दिली आहे ( Gondvlekar Maharaj donate Rs 50 lakh to PM care fund ). विश्वस्तांच्या या भाजप प्रेमामुळे गोंदवले परिसरातील लोकांनी संताप व्यक्त केला. सीएम फंडाला विश्वस्तांनी निधी का दिला नाही, असा रास्त आक्षेप लोकांनी घेतला.

लोकांच्या आक्षेपानंतरही विश्वस्तांनी सीएम फंडासाठी एका रूपयाचीही देणगी दिली नाही. पण पुण्यातील ससून रूग्णालयासाठी 25 लाख रुपये निधी दिला ( Gondvlekar Maharaj trust donate Rs 25 lakh to Sasoon hospital ). पुण्यातील ब्राह्मण समाज, तेथील महापालिकेत असणारी भाजपची सत्ता व विश्वस्तांचा पुणेरी पेशवाई बाणा या सगळ्या अनुषंगानेच पुण्यात मदत करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

कै. गोंदवलेकर महाराज ज्या गोंदवले गावचे आहेत, त्या गावात, तालुक्यात व जिल्ह्यात मात्र एका रुपया्चीही देणगी या विश्वस्तांनी कोविडसाठी दिली नाही.

हे सुद्धा वाचा

जयंत पाटील सीबीआय धाडीचा नोंदविला निषेध

संतापजनक : 700 बेडचे ‘कोरोना’ रूग्णालय दोन दिवसांत उभे राहणार होते, पण निलम गोऱ्हेंच्या आडमुठेपणामुळे ते रद्द झाले

गोंदवलेकर महाराज ट्रस्टची मुजोरी, बंद पडलेले रुग्णालय सुद्धा ‘कोरोना’ सेंटरसाठी देण्यास विरोध

अनिल देशमुखांविरोधात गुन्हा दाखल!

अनिल देशमुख के खिलाफ FIR

गोंदवलेकर महाराजांनी त्यांच्या हयातीतच अन्नछत्रासह अनेक सामाजिक उपक्रम राबविले होते. त्या परंपरेनुसार गोंदवलेकर महाराज मठामध्ये आजही मोठ्या प्रमाणात लोकांना अन्नदान केले जाते. दररोज शेकडो लोकांना भोजन दिले जाते.

कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे हे अन्नदानाचे काम थंडावले. त्यामुळे विश्वस्तांनी गेल्या वर्षी शिल्लक राहिलेले धान्य व शिधा आजबाजूच्या गावातील लोकांना दिला होता. या टिचभर कार्याचे मार्केटिंग करून ‘कोरोना’ काळात लोकांना मदत केल्याची जाहिरातबाजी विश्वस्त समर्थक काही चेलेचपाटे करीत आहेत.

वास्तविक, विश्वस्तांनी पीएम केअर फंड व ससून रूग्णालयाला जसा घसघशीत निधी दिला, तसा निधी महाराजांच्या गावाला, तालुक्याला किंवा जिल्ह्याला देण्याचे सौजन्य विश्वस्तांनी ( Gondvlekar Maharaj trust ) का दाखविले नाही, असा सवाल स्थानिक जनतेमधून करण्यात येत आहे.

पीएम केअरला 50 लाख दिले, मग सीएम फंडाला निधी का दिला नाही, असाही सवाल गोंदवले परिसरातील लोकांकडून करण्यात येत आहे.

गोंदवलेकर महाराज मठामध्ये 700 बेडचे कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला होता. गोरगरीब व रंजल्या गांजलेल्या लोकांची सेवा करण्याचा वस्तुपाठ गोंदवलेकर महाराजांनी घालून दिलेला आहे. त्याच्याशी सुसंगत अशी भूमिका घेऊन मंदिराच्या विश्वस्तांनी मोठ्या मनाने भक्त निवास व रूग्णालयाची जागा कोविड सेंटरसाठी द्यायला हवी होती. परंतु विश्वस्तांनी कडाडून विरोध केला. त्यासाठी भरपूर थयथयाट केला.

भाजप – आरएसएस धार्जिण्या व जातीयवादी विश्वस्तांनी विधानपरिषदेच्या उप सभापती निलम गोऱ्हे यांची दिशाभूल करून हे प्रस्तावित कोविड सेंटर रद्द करून घेतले ( Goldvlekar Maharaj trust given wrong information to Neelam Gorhe ). हे विश्वस्त निलम गोऱ्हे यांच्याकडे आल्यानंतर विश्वस्तांनी पीएम केअरला घसघशीत निधी दिला, तसा सीएम फंडाला निधी का दिला नाही, असा सवाल गोऱ्हे यांनी करायला हवा होता.

निलम गोऱ्हे यांनी विश्वस्तांना सवाल तर केला नाहीच, उलट त्यांचीच तळी उचलून दुष्काळी भागातील गोरगरीब मृत्यूच्या दाढेत ढकलले आहे ( Neelam Gorhe helped to Gondvlekar Maharaj trust ). अवघ्या दोन दिवसांत 700 बेडचे रूग्णालय उभे करण्याची तयारी सरकारी यंत्रणेने केली होती. ती रद्द होऊन फक्त 40 ते 50 बेडचे रूग्णालय कसेबसे उभे राहणार आहे. त्यातून माण – खटावची गरज पूर्ण होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, विश्वस्तांनी सीएम फंडासाठी 25 लाख रुपये दिल्याचा दावा मंदीर समर्थकांनी ‘लय भारी’कडे केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी