34 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeटॉप न्यूजमहात्मा गांधींची राखी सावंत सोबत केली तुलना, यूपी विधानसभेचे सभापती अडकले वादात

महात्मा गांधींची राखी सावंत सोबत केली तुलना, यूपी विधानसभेचे सभापती अडकले वादात

टीम लय भारी

लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभेचे सभापती हृदय नारायण दिक्षित यांनी ड्रामा क्विन राखी सावंतची तुलना महात्मा गांधींशी केली. त्यामुळे आता ते वादात अडकले आहेत. दिक्षितांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये ते कमी कपड्यांवर भाष्य करताना दिसत आहेत. दरम्यान ह्या वादानंतर  सभापतींनी, आपल्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे, असे ते बोलले (Hriday Narayan Dixit likens drama queen Rakhi Sawant to Mahatma Gandhi).

कीर्तनकार शिवलीला ताई बिग बॉसच्या घरात, जाणून घ्या त्यांच्या नावामागची कहाणी

शहनाजच्या भावाने हातावर गोंदविला सिद्धार्थचा टॅटू

नक्की काय घडले :

हृदय नारायण दिक्षित प्रबुद्ध परिषदेत महात्मा गांधीवर बोलत होते. ‘देशात जेव्हा गरिबी होती, तेव्हा त्यामुळे गांधीजी कमी कपडे घालायचे. धोतर नेसायचे, गांधीजींना अवघा देश बापू बोलायचा. जर टोकडे कपडे घालून कोणी महान बनले असते तर, राखी सावंत देखील महान बनल्या असत्या.’ हे त्यांचे वक्तव्य चांगलेच गाजले आणि ते वादात अडकले (Hriday Narayan Dixit : If someone had become great by wearing shorts, Rakhi Sawant would also have become great).

कॉमेडी क्वीन भारती सिंहने चक्क १५ किलो वजन केले कमी

‘Stay away from me and my name’: Rakhi Sawant lashes out at Raghav Chadha after comparison with Navjot Singh Sidhu

ह्या वक्तव्यामुळे टिका झाल्याने, स्पष्टीकरण देत त्यांनी सुधारित वृत्त करत या बाबतचा खुलासा केला आहे. ‘सोशल मीडियावर काही मित्रांनी माझ्या भाषणाची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल केली आहे, ज्यातून वेगळा अर्थ निघतो. हा व्हिडीओ उन्नाव इथल्या प्रबुद्ध परिषदेत केलेल्या माझ्या भाषणाचा एक भाग आहे. ज्यामध्ये सूत्रधारांनी माझी ओळख एक प्रबुद्ध लेखक अशी करुन दिली होती. केवळ पुस्तकं आणि लेख लिहले म्हणून कुणी प्रबुद्ध होत नाही. महात्मा गांधी कमी कपडे घालायचे, देशाने त्यांना बापू म्हटलं, पण याचा अर्थ असा नाही की राखी सावंतही महात्मा गांधी होऊ शकतील. कृपया करुन माझं भाषण वास्तवातील संदर्भ वापरुन घ्या.’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी