31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयअजितदादा, चंद्रकांत पाटलांवर करमणूक कर लावा : रुपाली चाकणकर

अजितदादा, चंद्रकांत पाटलांवर करमणूक कर लावा : रुपाली चाकणकर

टीम लय भारी

मुंबई :  राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर उपरोधीत टीका केली आहे. पाटलांमुळे महाराष्ट्रात सध्या निखळ मनोरंजन होत आहे. चंद्रकांत पाटलांची खिल्ली उडवणारे ट्विट रुपाली चाकणकर यांनी केले आहे. त्यांच्यावर अजितदादांनी करमणूक कर लावावा, अशी रुपाली चाकणकर यांनी मागणी केली आहे (Rupali Chakankar has slammed BJP State President Chandrakant Patil).

शिवसेना आणि राष्ट्रवादीचेच नव्हे तर काँग्रेस नेत्यांचे सुद्धा घोटाळे बाहेर येणार : चंद्रकांत पाटील

हसन मुश्रीफांना भाजपने प्रवेशाची ऑफर न दिल्याचा चंद्रकांत पाटलांचा दावा

‘चंद्रकांत दादा पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं एक गोड स्वप्न आहेत. कारण त्यांच्यामुळे महाराष्ट्रात सध्याला निखळ मनोरंजन होत आहे. महाराष्ट्राचे वित्तमंत्री म्हणून अजित दादांना माझी विनंती आहे की त्यांनी चंद्रकांतदादांवर करमणूक कर लावावा. केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राचे हक्काचे GST चे पैसे देत नाही निदान यांच्यावरील करमणूक करामुळे सरकारचा काही भार तरी हलका होईल.” असे ट्विट त्यांनी केले आहे. यावेळी त्यांनी केंद्राच्या जीएसटी परताव्यावरही निशाणा साधला आहे (Rupali Chakankar also targeting the Centre’s GST refund).

कीर्तनकार शिवलीला ताई बिग बॉसच्या घरात, जाणून घ्या त्यांच्या नावामागची कहाणी

Charges against NCP Minister: Pawar won’t support any wrongdoing, says Patil

‘महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना मी उद्धव ठाकरेंना सल्ला दिला होता की, राष्ट्रवादीकडे गृह खातं देऊ नका,’ असं चंद्रकांत पाटील म्हणाले. पाटलांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांसोबत शपथ घेतली तेव्हा तुम्ही हा सल्ला फडणवीसांना दिला होता का? असा सवाल पत्रकारांनी केला. पत्रकारांच्या या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी ‘देवेंद्र फडणवीस दबंग नेते आहेत, ते शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात, फडणवीसांच्या वयावर तुम्ही जाऊ नका’, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात बोलताना केले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी