33 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeराजकीयशिवसेना आणि राष्ट्रवादीचेच नव्हे तर काँग्रेस नेत्यांचे सुद्धा घोटाळे बाहेर येणार :...

शिवसेना आणि राष्ट्रवादीचेच नव्हे तर काँग्रेस नेत्यांचे सुद्धा घोटाळे बाहेर येणार : चंद्रकांत पाटील

टीम लय भारी

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठे विधान केले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचेच नव्हे तर काँग्रेस नेत्यांचे घोटाळे सुद्धा बाहेर येणार असे वक्तव्य पाटील यांनी केले आहे. येत्या दोन दिवसांमध्येच काँग्रेसच्या दोन नेत्यांची नावे समोर येतील असे पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले (Chandrakant Patil made a big statement on the leaders of Mahavikas Aghadi).

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी १०० कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात बोलत असताना, या आरोपामागे चंद्राकांत पाटील यांचा हात असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला होता. या संदर्भात पाटील यांनी लगेचच पत्रकार परिषद घेऊन मुश्रीफ यांचे आरोप मोडून पाडले आहेत.

हसन मुश्रीफांना भाजपने प्रवेशाची ऑफर न दिल्याचा चंद्रकांत पाटलांचा दावा

स्पर्धा होण्यापूर्वीच प्रथम क्रमांक देऊन मोकळ्या, पी ए बदलण्याचा नेटकऱ्यांनी दिला सल्ला

त्या वेळी त्यांनी घोटाळ्यात शिवेसना आणि राष्ट्रवादीचे आमदार सापडत आहेत, असे अनेकांना वाटतं आहे. परंतु दोन काँग्रेस नेत्यांची नावे आली आहेत आणि येत्या दोन दिवसांमध्ये त्यांचे विषयही समोर येतील असे खळबळजनक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

रोहित पवारांनी भारताच्या संरक्षण क्षमतेवर प्रश्न उपस्थित केला

Mumbai: BJP will support and ensure justice for Karuna Sharma, says Chandrakant Patil

त्याचबरोबर पाटीलांनी मुश्रीफ यांनी भाजपने त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिल्याचा दावाही खोटा पाडला आहे. भाजपने मुश्रीफ यांना कोणतीही ऑफर दिली नव्हती. त्याचबरोबर ऑफर नाकारल्यामुळे एखाद्या व्यक्तीला त्रास देण्याची संस्कृती आमची नाही, असे पाटील म्हणाले. तसेच मुश्रीफ यांनी सगळा ड्रामा बंद करावा व कायद्याची लढाई कायद्याने लढावी असे ही चंद्रकांत पाटील म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी