29 C
Mumbai
Friday, July 5, 2024
Homeटॉप न्यूजAFCAT Recruitment 2022: भारतीय हवाई दलाच्या सामान्य प्रवेश परीक्षेचं नोटिफिकेशन जारी; 317...

AFCAT Recruitment 2022: भारतीय हवाई दलाच्या सामान्य प्रवेश परीक्षेचं नोटिफिकेशन जारी; 317 जागांवर भरती

टीम लय भारी

नवी दिल्ली: भारतीय हवाई दलानं सामान्य प्रवेश परीक्षा ( Air Force Common Admission Test 2022) साठी 317 जागांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे(Indian Air Force : Recruitment process for 317 posts)

 इंडियन एअर फोर्सनं त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर भरतीबाबत नोटिफिकेशन जारी केलं आहे. सामान्य प्रवेश परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची ऑनलाईन प्रक्रिया 1 डिसेंबरपासून सुरु होणार आहे.

कोरिओग्राफर शिवा शंकर याचं करोनामुळे निधन, सोनू सूदने शेअर केली भावूक पोस्ट

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्राची नवी नियमावली; 12 देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांवर घातली बंधने

कोणत्या पदांसाठी भरती?

भारतीय हवाई दलाच्या नोटिफिकेशननुसार कमिशन्ड ऑफिसर या पदांसाठी भरती होणार आहे. पात्र उमेदवार भारतीय हवाई दलाच्या https://careerindianariforce.cdac.in/ किंवा https://afcat.cdac.in या वेबसाईटवर भेट देऊन अर्ज सादर करु शकतात.

अर्ज सादर करण्याची मुदत 1 डिसेंबर ते 30 डिसेंबरच्याच्या दरम्यान आहे. भारतीय हवाई दलाच्या वेबसाईटवर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीद्वारे नोंदणी करु शकतात. इंडियन एअरफोर्सच्या माहितीनुसार एकूण कमिशन्ड ऑफिसर पदाच्या 317 पदांवर भरती होणार आहे.

संसदेचं अधिवेशन वादळी ठरणार, एमएसपी, महागाई विरोधकांच्या अजेंड्यावर

Military Digest | Op Trident: When Indian Navy struck at the heart of Pakistan

यामध्ये अफकॅट एन्ट्रीद्वारे फ्लायिंग साठी 77 जागा, ग्राऊंड ड्यटीच्या 129, ग्राऊंड ड्युटी नॉन टेक्निकल पदासाठी 111 पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

शैक्षणिक पात्रता

इंडियन एअर फोर्समध्ये फ्लाईंग पदासाठी अर्ज करणारे उमेदवार पदवीधर असावेत. मात्र, बारावीला विज्ञान शाखेतून गणित आणि भौतिकशास्ज्ञ विषयासह 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेले असावेत. ग्राऊंड ड्यटी टेक्निकल पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा 50 टक्के गुणांसह फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स विषयासह 12 वी उत्तीर्ण असावा.

तर, ग्राऊंड ड्युटी नॉन टेक्निकल पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. अर्ज करण्यपूर्वी उमेदवारांनी ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन नोटिफिकेशन पाहणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी