32 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeटॉप न्यूज100 कोटी वीजबिल माफीसाठी चेंबूरच्या रहिवाशांचा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जनआक्रोश मोर्चा

100 कोटी वीजबिल माफीसाठी चेंबूरच्या रहिवाशांचा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जनआक्रोश मोर्चा

रविंद्र भोजने : टीम लय भारी

मुंबई : चेंबूर सिद्धार्थनगर येथील रहिवाशांना अंधारात ठेवत सुमारे 100 कोटीचे वीजबिल संबंधित बिल्डरानी थकविल्याप्रकरणी मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी मोर्चा काढण्यात येणार आहे. सिद्धार्थ कॉलनी, चेंबुर, मुंबई-७१ येथील न. क्र. ४७० (पार्ट) व ४७१ या मिळकतीवर सन २००८ पासुन एसआरए प्रकल्प राबवला जात आहे. सदर प्रकरणात आदिशक्ती डेव्हलपर्स यांनी रहिवाशांचा वीज बील व पाणी बील भरणार असे आश्वासन दिले, पण त्यांनी वीज बील भरले नाही(Janakrosh Morcha at CM’s residence by Chembur residents electricity bill waiver).

तब्बल १३ वर्षे रिलायन्स एनर्जी कंपनीने थकीत वीज बिलाबाबत एकही नोटीस दिली नाही. आज सन २०२२ पर्यंत प्रत्येक वीज ग्राहकांवर ४ लाखापासुन ते ४० लाखापर्यंत वीज बिल थकीत आहे. रिलायन्स एनर्जीने नियमानुसार कारवाई केली असती तर आज इतका थकीत वीज बील रहिवाश्यांचा झालाच नसता. रिलायन्स कंपनीने कायद्यानुसार
कारवाई केली नाही त्यामुळे रहिवाशांना वाटले की विकासक वीज बील भरत आहे.

परंतु सन २०१९ रोजी जेव्हा अदानी इलेक्ट्रीसीटीने रिलायन्स एनर्जी विकत घेतल्यानंतर नियमानुसार वीज ग्राहाकांवर कारवाई केल्यानंतर माहीत पडले की विकासकाने वीज बिल भरलेला नाही आज 100 करोड वीज बील थकीत आहे, असे कंपनी सांगते.

हे सुद्धा वाचा

आझाद मैदानावर उद्यापासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

भटक्या विमुक्त कंत्राटदाराचे बिल थकवले, सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात कंत्राटदाराचे उपोषण

NCP workers stage protest as ED grills minister Nawab Malik

या थकीत वीज बिलास पूर्णपणे विकासक व रिलायन्स एनर्जी जबाबदार आहे. दरम्यान दिनांक १५ फेब्रुवारी पासुन रोज ९ तास वीज खंडीत केली जाते. यामुळे रहिवाशी हैराण झाले आहेत.

अदानी कंपनीने रहिवाश्यांच्या थकीत विज बिलात रिलायन्स एनर्जी ज्या विकासकाच्या आश्वासनावर थांबली त्या विकासकास थकीत वीज बिलास जबाबदार धरावे. अदानी इलेक्ट्रीसीटीवर अॅक्ट्रॉसिटी अॅक्ट खाली गुन्हा नोंद करावी. रहिवाशांचा थकीत वीज बिल माफ करावा, या मागणीकरिता आम्ही मुख्यमंत्री यांना भेटणार आहोत, असे येथील रहिवाशी श्री. राजाराम कदम यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी