30 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeटॉप न्यूजशिवाजी पार्कमध्ये मनसे विरुद्ध शिवसेना... शिवाजी पार्कचे नुतनीकरण सुरू असताना वादाला सुरुवात!

शिवाजी पार्कमध्ये मनसे विरुद्ध शिवसेना… शिवाजी पार्कचे नुतनीकरण सुरू असताना वादाला सुरुवात!

टीम लय भारी

मुंबई : सध्या शिवाजी पार्क मैदानाचे नुतनीकरणाचे काम सुरू आहे. मात्र या नूतनीकरणात वापरात येणाऱ्या साहित्यात प्रामख्याने खडीचा वापर होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. शिवाजी पार्कमधील रस्त्यावरुन मनसे विरुद्ध शिवसेना यांच्यात संघर्ष सुरु झाला आहे. मनसेच्या वतीने महापालिकेच्याविरोधात या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. या आंदोलन प्रकरणी पोलिसांनी मनसैनिकांना ताब्यात देखील घेतलं आहे. अशी माहिती समोर आली आहे(MNS against Shiv Sena while renovation of Shivaji Park is underway).

शिवाजी पार्क नूतीकरणासाठी कामातील साहित्यात खडीचा वापर करण्यास मनसेकडून विरोध करण्यात आला होता. आणि आता याच विरोधात मनसेने शिवाजी पार्कमध्ये आंदोलन देखील सुरू केले आहे. मनसेच्या या आंदोलनाला स्थानिकांनी देखील पाठिंबा दिला असून, मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी या ठिकाणी दौरा केला असता या ठिकाणी सिमेंटचा रस्ता असणार नाही असे आश्वासन दिले होते, मग शिवाजी पार्कचे नुतनीकरण सुरू असताना मैदानाच्या मधोमध खडी टाकून त्यावर माती टाकण्यात आली होती. आणि याच मुळे मनसैनिक आक्रमक झाल्याचं दिसून आलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत पालिका प्रशासनाने बैठक घेतली होती. त्यावेळी खडी ऐवजी ब्रिक्सचा वापर करणार असे सांगितले गेले होते. मात्र त्या जागी खडी दिसून आल्याने मनसैनिक व स्थानिक रहिवाशी भलतेच आक्रमक झाले असे दिसले. आणि त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले असे दिसले.

हे सुद्धा वाचा

मनसेकडून लता मंगेशकरांच्या स्मारकाबाबत पहिली प्रतिक्रिया

महापालिका निवडणुकीसाठी मनसेची रणनिती ठरली, स्वबळावर निवडणूक लढवणार

How Raj Thackeray and his MNS are planning to resurrect themselves in ‘do-or-die’ BMC polls

मैदानात उडणाऱ्या धुळीमुळे होणाऱ्या त्रासातून रहिवाशांची सुटका करण्यासाठी शिवाजी पार्कमध्ये नूतनीकरण करण्यात येत आहे, तरी मैदानात बांधण्यात येत असलेल्या मातीच्या रस्त्यावरून नवा वाद उभा राहिला असून, शिवाजी पार्कच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि मनसेमध्ये पुन्हा जोरदार वाद सुरू होणार का अशी शक्यता दर्शवली जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी