29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeआरोग्यपालकांनो तुम्हाला माहिती आहे का ? तुमच्याही मुलांना असू शकतो तोंडाचा, दातांचा...

पालकांनो तुम्हाला माहिती आहे का ? तुमच्याही मुलांना असू शकतो तोंडाचा, दातांचा आजार

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : भारतातील प्रत्येक दहापैकी आठ मुलांना कोणता ना कोणता तोंडाचा विकास असल्याचे आढळून आले आहे. कंतार – आयएमआरबी या संस्थेने केलेल्या पाहणीमध्ये ही बाब आढळून आली आहे. कंतारने कोलगेट – पामोलिव्ह यांच्या वतीने ही पाहणी केली होती.

पालकांनो तुम्हाला माहिती आहे का ? तुमच्याही मुलांना असू शकतो तोंडाचा, दातांचा आजार

दातांवर पांढरे ढाग, हिरड्या दुखणे, हिरड्यातून रक्त येणे, श्वास घेण्यास अडचण होणे असे मुलांमध्ये आजार आढळून आले आहेत. तीन पैकी दोन मुलांमध्ये दात किडले असल्याचेही पाहणीमध्ये आढळून आले आहे. केवळ मुलांमध्येच नाही, तर प्रौढांमध्येही 10 पैकी 9 जणांना तोंडाचे विकास असल्याचे आढळून आले आहे.

भारताच्या चार भागांमध्ये ही पाहणी करण्यात आली होती. देशाच्या पूर्व (89 टक्के), पश्चिम (88 टक्के), उत्तर (85 टक्के) आणि दक्षिण (64 टक्के) भागांमध्ये अशा प्रमाणात तोंडाचे आजार आढळून आले आहेत.

पालकांमधील अज्ञान कारणीभूत

विशेष म्हणजे, बहुतांश पालकांना असे वाटते की, त्यांच्या मुलांना तोंडाचे किंवा दातांचे विकार नाहीत. आपल्या मुलांच्या तोंडाचे व दातांचे आरोग्य चांगले आहे. पण असे वाटणाऱ्या पालकांच्या तब्बल 80 टक्के मुलांमध्ये किमान एक तरी तोंडाचा विकार आढळून आला आहे. पालकांमधील हा गैरसमज कोलकाता (92 टक्के), मुंबई (88 टक्के) आणि हैदराबाद (80 टक्के) अशा प्रमाणात आढळून आला आहे.

तोंडाच्या स्वच्छतेबाबत मुले व त्यांचे पालक जागरूक नसल्याचेही या पाहणीत आढळून आले आहे. 70 टक्क्यांपेक्षा जास्त मुले दिवसांतून किमान दोन वेळा दात ब्रशने घासत नाहीत. त्यातील 60 टक्के मुले दातांच्या डॉक्टरकडे गेल्या वर्षभरात गेलेलीच नाहीत. तोंडाचे आजार असणाऱ्या 10 पैकी 8 मुले गोड पदार्थ जास्त खात असल्याचेही पाहणीत आढळून आले आहे. 44 टक्के मुलांमध्ये तर दातांच्या मुळांपर्यंत आजार असल्याचे आढळून आले आहे. दंत प्रत्यारोपणासारखे उपचार त्यासाठी घ्यावे लागणार आहेत.

पालकांनो तुम्हाला माहिती आहे का ? तुमच्याही मुलांना असू शकतो तोंडाचा, दातांचा आजार

दुधाचे दात पडू लागतानाच्या काळात त्याची काळजी घ्यायला पाहिजे याची अनेक पालकांना जाणीवच नसल्याचेही समोर आले आहे. दुधाच्या दातांमुळे मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी मदत होत असते. मुलं दाताने अन्न चावत असते, त्यावेळी त्याच्या जबड्याचा विकास होत असतो. या प्रक्रियेत दात मजबूत होण्यास मदत होते. दुधाचे दात असतानाच्या काळात दुर्लक्ष केल्यामुळे दात किडणे आणि तोंडाचे आजार बळावत असल्याचे भारतीय दंतशास्त्र व दंत संरक्षण सोसायटीच्या सदस्या डॉ. मिनाक्षी खेर यांनी सांगितले.

भारतीय सार्वजनिक दंत आरोग्य संघटनेचे अध्यक्ष व्ही. गोपाळकृष्ण यांनी या पाहणीतील निष्कर्षानंतर चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, तोंडाच्या विकाराबद्दल आपल्या देशात जनजागृती होणे गरजेचे आहे. तोंडाच्या विकारामुळे मधुमेह, मुदतपूर्व जन्म असे दुष्परिणामही जाणवतात. दातांच्या आजारांचे योग्य व्यवस्थापन व्हायला हवे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाला मदत होईल, अशीही आशा त्यांनी व्यक्त केली.

कंतार – आयएमआरबीने ही पाहणी 2,030 प्रौढांमध्ये, व 1080 मुलांमध्ये केली. वेगवेगळ्या सामाजिक व आर्थिक वातावरणातील मुलांमध्ये ही पाहणी करण्यात आली होती. देशातील प्रमुख 12 शहरांचा यांत समावेश केला होता. मुंबई, पुणे, दिल्ली, चंदीगड, लखनौ, अहमदाबाद, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू, कोतकाता, भुवनेश्वर आणि पटना या शहरांमध्ये ही पाहणी करण्यात आली. कंतार – आयएमआरबीच्या टीमसोबत दातांच्या डॉक्टरांचा समावेश होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी