29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeटॉप न्यूजरोहित पवार ठरले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक संपत्ती असलेले उमेदवार

रोहित पवार ठरले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक संपत्ती असलेले उमेदवार

लयभारी न्यूज नेटवर्क

मुंबई  : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे नातू रोहित पवार हे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत – जामखेड विधानसभामतदारसंघातून मंत्री राम शिंदे यांच्या विरोधात विधानसभेची उमेदवारी करत आहेत. गुरूवारी रोहित पवार यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज कर्जत येथे दाखल केला. पवार यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जातील प्रतिज्ञापत्रानुसार ते अहमदनगर जिल्ह्यातील इतर दिग्गज उमेदवारांपैकी सर्वाधिक संपत्ती असलेले उमेदवार ठरले आहेत. रोहित पवार यांच्याकडे तब्बल 54 कोटी 78 लाखाची संपत्ती आहे.

गुरुवारी अहमदनगर जिल्ह्यातील अनेक दिग्गज उमेदवारांनी वेगवेगळ्या मतदारसंघात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्या अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात उमेदवारांनी त्यांच्याकडे असलेल्या स्थावर व जंगम संपत्तीची माहिती दिली आहे. त्यानुसार कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी करत असलेल्या रोहित पवार यांनी शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या व त्यांच्या पत्नीकडे एकत्रित 54 कोटीची संपत्ती असल्याचे नमुद केले आहे. 54 कोटींपैकी दोघांकडे 25 कोटीची जंगम मालमत्ता आहे. दोघांकडे मिळून तब्बल 3 किलो 100 ग्रॅम सोने आहे. रोहित पवार हे महागड्या घड्याळाचे शौकिन असून, त्यांच्याकडे वेगवेगळ्या कंपन्यांची 28 लाखांची 5 घड्याळे आहेत. पत्नीकडेही 7 लाखांचे एक घड्याळ आहे.

दरम्यान रोहित पवार ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत त्या मंत्री राम शिंदे यांच्याकडे अवघी दोन कोटी बेचाळीस लाखांची संपत्ती असल्याची माहिती समोर येत आहे.

अशी आहे रोहित पवारांची संपत्ती

राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार कुटूंबाकडे एकुण 54 कोटी 78 लाख रूपयांची संपत्ती आहे. यामध्ये २५ कोटी ६८ लाख रूपयांची जंगम संपत्ती आहे. तर २९ कोटी १० लाख रूपयांची स्थावर संपत्ती आहे. रोहित पवार यांच्यावर ३ कोटी ७४ लाखांचे कर्ज आहे. त्यांच्याकडे दोन गाड्या आहेत. तसेच ३ किलो १०० ग्रॅम सोने व इतर दागिणे आहेत. त्यांच्यावर कुठल्याही स्वरूपाचा एकबी गुन्हा दाखल नाही. त्यांचे बॅचलर ऑफ मॅनेजमेंटमधून शिक्षण झाले आहे. सध्या ते पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य, साखर कारखान्याचे संचालक, देशातील खाजगी साखर कारखानदारीतील संघटनेचे अध्यक्ष तसेच बारामती अॅग्रोचे मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी