29 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeटॉप न्यूजतब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना अटक

तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना अटक

टीम लय भारी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांची सकाळपासून चौकशी करण्यात आली होती. तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे(Nawab Malik arrested after eight hours of ED interrogation). 

ईडी चे पथक सकाळी सहा वाजता त्यांच्या घरी पोहचले तर त्यानंतर जवळपास दोन तास चर्चा सुरू होती. त्यानंतर सकाळी सात वाजता नवाब मलिक यांनी स्वत: हून ईडी कार्यालयात चौकशीसाठी येत असल्याचे सांगितले, व ते कार्यालयात दाखल झाले. अशी माहिती सूत्रांनी दिली.

मात्र आता नुकतेच ऐकण्यास आले आहे की, तब्बल आठ तास कसून चौकशी केल्यानंतर त्यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. अनेक राष्ट्रवादी नेते व कार्यकर्ते ईडी कर्यालयासमोर आक्रमक झाल्याचे दिसले. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जे.जे. रुग्णालयात नेण्यात आहे. आता या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत.

हे सुद्धा वाचा

जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल, हे वर्तन देशाच्या संघराज्य व्यवस्थेच्या विरोधात आहे

रोहित पवारांचा घणाघात, उत्तर प्रदेशमधील सत्ता वाचवण्यासाठी भाजपने सूडबुद्धीने कारवाई केली

Nawab Malik arrested by ED in money laundering case linked to Dawood Ibrahim

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी