29 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराजकीय"हा भाजपाचा नवा धंदा", नवाब मलिकांच्या ईडी कारवाईवरून नाना पटोलेंनी व्यक्त केला...

“हा भाजपाचा नवा धंदा”, नवाब मलिकांच्या ईडी कारवाईवरून नाना पटोलेंनी व्यक्त केला संताप

टीम लय भारी

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर आज ईडीची चाप पडली आहे. तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. अनेक राष्ट्रवादी नेत्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे. त्यावर नाना पटोले यांनी नवाब मलिकांचं समर्थन केलं असून त्यांना पाठिंबा देत संतापजनक व्यक्तव्य केले आहे(Nana Patole expressed outrage over the ED action of Nawab Malik).

नवाब मलिक सातत्याने केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवत होते. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई झाली असून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत अस नाना पटोले म्हणाले आहेत. नाना पटोले पुढे म्हणाले की, नवाब मलिक यांच्यावर केलेल्या कारवाईचे आश्चर्य आम्हाला वाटत नाही. आणि नवाब मलिक हे या कारवाई ला घाबरत देखील नाहीत.कारण केंद्र सरकारच्या विरोधात जो कोणी बोलतो त्याच्याविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून कारवाई केली जाते. यापूर्वीही विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांवर अशीच कारवाई केलेली आहे.

त्यात पुढे यांनी भाजपला टोला लगावला आहे, ते म्हणाले, “भाजपाचा हा नवा धंदा आहे. असे दिसून येत आहे. विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी या केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे. केंद्रात सत्ता असल्याचा माज भाजपाला असून अशा कारवायांविरोधात आता चर्चा करून आम्ही सर्व मिळून लढा देऊ असे ते म्हणाले आहेत.

हे सुद्धा वाचा 

तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना अटक

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांच्या कारवाईनंतर शरद पवारांचं मोठं वक्तव्य

जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल, हे वर्तन देशाच्या संघराज्य व्यवस्थेच्या विरोधात आहे

Nawab Malik arrested: Will fight and win, won’t bow down, says NCP leader on ED action

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी