28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeटॉप न्यूजअनुसूचित जाती-जमाती तसेच नवबौद्ध लोकांना आता त्यांचे हक्काचे घर मिळणार

अनुसूचित जाती-जमाती तसेच नवबौद्ध लोकांना आता त्यांचे हक्काचे घर मिळणार

टीम लय भारी

मुंबई (दि. 29) —- : अनुसूचित जाती-जमाती तसेच नवबौद्ध लोकांना आता त्यांचे हक्काचे घर मिळणार आहे(Ramai Awas Yojana: Benefit of Gharkula to everyone who is eligible)

यासाठी रमाबाई घरकुल योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातल्या ग्रामीण भागात १ लाख १३ हजार ५७१ आणि शहरी भागात २२ हजार ६७६ घरांच्या २०-२१ या आर्थिक वर्षासाठी राज्य सरकारने मान्यता दिली आहे तसेच महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनीसुद्धा मान्यता दर्शवली आहे.

दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत परतलेल्या व्यक्तीला ‘ओमिक्रॉन’ करोनाचा संसर्ग?

नबाब मलिक बस नाम ही काफी है….

महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागाचे अवर सचिव अ. को. अहिरे प्रस्तावास मान्यता दिल्याचा निर्णय केला आहे.

सामाजिक न्याय विभागाचे अवर सचिव अ. को. अहिरे यांनी याबाबतच्या प्रस्तावास मान्यता दिल्याचा निर्णय निर्गमित केला आहे.

अर्जुन खोतकरांच्या घरी मध्यरात्री दोन वाजेपर्यंत ईडीचा मुक्काम! साखर कारखाना घोटाळा प्रकरणी चौकशी सुरू!

News updates from HT: Singapore to resume flights to India from today and all the latest news

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील आर्थिक दुर्बल कुटुंबांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रमाई आवास योजनेच्या माध्यमातून पात्र असलेल्या प्रत्येकाला या योजनेचा लाभ देण्याचा आमचा प्रयत्न आहे. भविष्यात या उद्दिष्टात आणखी वाढ करण्यात येईल व या योजनेस कुठेही निधीची कमतरता भासणार नाही यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

विभागनिहाय मान्यता मिळालेली आकडेवारी

मराठवाड्यात औरंगाबाद विभागात ग्रामीणच्या 30116 व शहरी भागाच्या 7565 घरकुलांना मंजुरी

लातूर विभागात ग्रामीणच्या 24274 तर शहरी भागाच्या 2770 घरकुलांना मंजुरी

नागपूर विभागात ग्रामीणच्या 11677 तर शहरी विभागाच्या 2987 घरकुलांना मंजुरी

अमरावती विभागात ग्रामीणच्या 21978 तर शहरी भागातील 3210 घरकुलांना मंजुरी

पुणे विभागात ग्रामीणच्या 8720 तर शहरी भागातील 5792 घरकुलांना मंजुरी

नाशिक विभागात ग्रामीणच्या 14864 तर शहरी भागातील 346 घरकुलांना मंजुरी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी