31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeटॉप न्यूज#VidhanSabha : ज्युनियर आर. आर. पाटलांच्या खांद्यावर प्रचाराची धुरा

#VidhanSabha : ज्युनियर आर. आर. पाटलांच्या खांद्यावर प्रचाराची धुरा

राजू थोरात : लय भारी न्यूज नेटवर्क

तासगाव : तासगाव विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार सुमनवहिनी पाटील यांना पुनश्च उमेदवारी दिला. कै. आर. आर. आबा पाटील यांच्या त्या पत्नी आहेत. येत्या गुरूवारी जोरदार शक्तीप्रदर्शनात त्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. परंतु प्रचाराची पूर्ण धुरा सुमनताई व कै. आबांचे चिरंजीव रोहितदादा पाटील यांच्या खांद्यावर असणार आहे.

#VidhanSabha : ज्युनियर आर. आर. पाटलांच्या खांद्यावर प्रचाराची धुरा

रोहित पाटलांचे भाषण हुबेहुबे आर. आर. आबांसारखेच  

सुमनवहिनी पाटील यांच्या प्रचाराची धुरा यावेळी त्यांचे चिरंजीव रोहित पाटील यांच्या खांद्यावर असेल. रोहित पाटील हे हुबेहुब आर. आर. पाटील यांच्यासारखेच भाषण करतात. त्यांना ज्युनियर आर. आर. पाटील अशा नावाने संबोधण्यात येते. तासगाव मतदारसंघातून रोहित यांनाच आमदार म्हणून निवडून आणण्याचे अनेकांचे स्वप्न आहे. परंतु उमेदवारीसाठी आवश्यक असलेली 25 वर्षे वयाची अट रोहित यांनी पूर्ण केलेली नाही. त्यामुळे यावेळी सुद्धा सुमनवहिणींचा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे.

अजित घोरपडे, प्रशांत शेजाळ यांचीही तयारी

बहुजन वंचित आघाडीतर्फे प्रशांत शेजाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये आलेल्या अजित घोरपडे यांनीही निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. पक्षाचे तिकिट मिळाले नाही तर ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार आहेत. भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांनीही त्यांच्या पत्नी ज्योतीताई पाटील यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू ठेवले असल्याची चर्चा आहे. घोरपडे यांना उमेदवारी देण्यास संजयकाकांच्या समर्थकांचा कडाडून विरोध आहे. त्याबाबत सोशल मीडियामध्येही जोरदार प्रचार चालला आहे. पण भाजप – शिवसेनेच्या महायुतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. तो भाजपला मिळावा असेही डावपेच सुरू आहेत. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहील अशी चिन्हे आहेत. त्याबाबतचा फैसला आज होईल, असे सूत्रांनी सांगितले.

शिवसेनेकडून साहेबराव पाटील, खरमाटे, कोळेकर, काळे इच्छूक

दुसरीकडे भाजपमधून नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले साहेबराव पाटील व छायाताई  खरमाटे यांनी उमेदवारीवर दावा केला आहे. शिवाय भाऊसाहेब कोळेकर, दिनकर पाटील, अमोल काळे उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. अमोल काळे हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. त्यांनी तासगावमध्ये शिवसेना जिवंत ठेवण्याचे काम चोखपणे पार पाडले आहे.

विरोधी उमेदवारांच्या नावाला मिळेना मुहूर्त

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुमनवहिनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्याची जोरदार तयारी सुरू आहे. दुसरीकडे मात्र विरोधकांचा अद्याप उमेदवार निश्चित झालेला नाही. त्यामुळे सुमनवहिनींविरोधात नेमके कोण लढणार याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

बहुजन ‘वंचित’ आघाडी कडून प्रशांत शेजाळ लढणार

वंचित बहुजन आघाडीकडून प्रशांत शेजाळ हे निवडणूक लढवणार आहेत. पक्षाने शेजाळ यांना तिकिट जाहिर केले आहे. येत्या शुक्रवारी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

अर्ज भरताना वंचित बहुजन आघाडीकडूनही जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी सुरू आहे. सिद्धेश्वर मंदिर येथून पदयात्रेला सुरुवात होईल. बस स्थानक चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शिवाजी महाराज पुतळ्य़ालाही वंदन करून गणपती मंदिर येथे गणरायाचे दर्शन घेउन अर्ज दाखल करणार आहेत.

तासगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, अपक्ष अजितराव घोरपडे गट व शिवसेना असे उमेदवारांचे एका मागोमाग एक असे अर्ज दाखल होणार आहेत. त्यामुळे पुढील दोन – तीन दिवसांत शहराला यात्रेचे स्वरूप आलेले असेल, असे चित्र दिसत आहे.

राष्ट्रवादीची खिंड रोहित पाटील लढवणार

रोहितदादा यांचे 22 वर्षे वय असल्यामुळे त्यांना निवडणूक लढवता येणार नाही. पण आपल्या आईच्या निवडणुकीची पूर्ण धुरा रोहितदादा यांच्या खांद्यावर आहे. मतदारसंघातील तरूणांची फौज रोहितदादांच्या दिमतीला आहे. तरूणांमध्ये त्यांच्याविषयी कमालीची क्रेझ आहे. मतदारसंघात त्यांना ज्युनियर आर. आर. पाटील अशा नावाने ओळखले जातात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी