33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeटॉप न्यूज#TheSkyIsPink : प्रियांका म्हणते, माझ्यासाठी हा चित्रपट खास

#TheSkyIsPink : प्रियांका म्हणते, माझ्यासाठी हा चित्रपट खास

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : #TheSkyIsPink हा चित्रपट येत्या 11 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्या निमित्ताने अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पालक व मुलांमधील नाजूक नाते सांगणारा हा चित्रपट आहे. त्यामुळे तो माझ्यासाठी स्पेशल आहे, असे तिने म्हटले आहे.

#TheSkyIsPink : प्रियांका म्हणते, माझ्यासाठी हा चित्रपट खास

सुखी पती पत्नीच्या आयुष्यात एक लाडकी लेक आलेली असते. पण फुफ्फुसाच्या आजाराने या लेकीचे निधन होते. लेकीच्या विरहामुळे पती – पत्नीची होणारी तगमग या चित्रपटात दाखविण्यात आली आहे. प्रियांका चोप्राने पत्नीची म्हणजेच लेकीच्या आईची भूमिका केली आहे. तर फरहान अख्तरने प्रियांकाच्या पतीची भूमिका केली आहे. झायरा वासिम हिने लेकीची भूमिका साकारली आहे.

माझे आई वडील सुद्धा असेच प्रेमळ होते. त्यांनी मला कमालीचे पाठबळ दिले. मला जे काही करायचे आहे, ते त्यांनी मला करू दिले. म्हणूनच मी आजवरच्या या स्थानापर्यंत पोहोचू शकले.

प्रियांका चोप्रा

एका सत्य घटनेशी निगडीत ही कहाणी आहे. मुलीच्या विरहाने त्या दांपत्याला कोणत्याही परिस्थितीमधून सामोरे जावे लागले असेल याची कल्पनाच न केलेली बरी. म्हणून माझ्यासाठी हा चित्रपट खास असल्याचे प्रियांकाने म्हटले आहे. सध्याच्या निगरगट्ट जगामध्ये आपण आपले आयुष्य जगतो. पण जर तुम्हाला तुमचे कुटुंब असेल, कुटुंबाकडून आधार मिळत असेल तर तुम्ही त्याला कसे सामोरे जाल हे या चित्रपटातून दाखविण्यात आल्याचे प्रियांका म्हणते. जेव्हा या चित्रपटाचे कथानक माझ्याकडे आले. ते मी वाचले अन् उडाल्याचे तिने सांगितले.

चित्रपट हृदयातही ठेवा

तिने प्रेक्षकांनाही सल्ला दिला आहे. ती म्हणते, हा चित्रपट पाहून तुम्ही विसरून जाऊ नका. तो नुसता डोक्यातच नाही, तर हृदयातही जपून ठेवा. या चित्रपटात रोहित सराफ याचीही भूमिका आहे. तो म्हणतो की, प्रेम, एकोपा आणि त्यानंतर विरह असा संदेश हा चित्रपट देतो. अतिशय अस्सल आणि वेगळ्या पद्धतीचा अनुभव देणार चित्रपट आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर माझा दृष्टीकोनच बदलून गेला. त्यामुळे लोकांनी तो जरूर पाहिला पाहिजे, असेही रोहितने म्हटले आहे.

#TheSkyIsPink : प्रियांका म्हणते, माझ्यासाठी हा चित्रपट खास

#TheSkyIsPink : प्रियांका म्हणते, माझ्यासाठी हा चित्रपट खास

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी