31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeटॉप न्यूजVideo : रोहित पवारांचा सवाल, कोल्हापूरचे चंद्रकांतदादा पुण्यातून निवडणूक लढवू शकतात,  मग...

Video : रोहित पवारांचा सवाल, कोल्हापूरचे चंद्रकांतदादा पुण्यातून निवडणूक लढवू शकतात,  मग मी कर्जत – जामखेडमधून का नाही ?

लयभारी न्यूज नेटवर्क : सत्तार शेख

अहमदनगर : कोल्हापूरचा उमेदवार पुण्यात उभा राहू शकतो तर मग मी कर्जत – जामखेडमध्ये का नाही. जसा त्यांचा पुण्यातून उमेदवारी करण्याचा हक्क आहे तसाच माझाही कर्जत – जामखेडमधून उमेदवारी करण्याचा हक्क आहे असे चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपकडून गेल्या काही दिवसांपासून कर्जत – जामखेडमध्ये सुरू असलेल्या ‘बाहेरचा उमेदवार’ या अपप्रचाराचा पवार यांनी जोरदार समाचार घेतला. कोण बाहेरचा कोण लांबचा यापेक्षा कोण कामाचा आहे हे महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र हेच पवार कुटूंबाचे घर आहे. माझी उमेदवारी ही घरातल्या माणसांच्या सेवेसाठी आहे. म्हणूनच कर्जत – जामखेडची जनता परिवर्तनासाठी सज्ज झाली आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी केले.

गुरूवारी दुपारी राष्ट्रवादी – काँग्रेस आघाडीचे उमेदवार रोहित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. तत्पूर्वी सकाळी कर्जत शहरातील अक्काबाई चौक ते दादा पाटील विद्यालय अशी भव्य रॅली काढण्यात आली होती. हजारो नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने कर्जत शहर गर्दीने फुलून गेले होते. दरम्यान रॅली दादा पाटील विद्यालयासमोरील मैदानात आल्यानंतर तिचे सभेत रूपांतर झाले. ऑक्टोबर हिटचा तडाखा असतानाही हजारोचा जनसागर सभेला लोटला होता.

Video : रोहित पवारांचा सवाल, कोल्हापूरचे चंद्रकांतदादा पुण्यातून निवडणूक लढवू शकतात,  मग मी कर्जत – जामखेडमधून का नाही ?

उन्हाची,  उकाड्याची तमा न बाळगता सभेत वेगळाच जोश होता. दरम्यान उन्हात बसलेले कार्यकर्ते व जनता पाहून रोहित पवारांनी सभास्थानी उभारलेल्या मंडपात न बसता थेट गर्दी उभ्या असलेल्या एका छोट्या टॅम्पोच्या टपावर चढत उन्हात बसूनच कार्यकर्त्यांची भाषणे ऐकली. भर दुपारी तळपत्या उन्हात सुरू असलेल्या सभेत रोहित पवारांनी माईकचा ताबा घेतल्यानंतर ” माझे कार्यकर्ते जर उन्हात बसले आहेत तर मग मी सावलीत कसा बसणार ” हे वाक्य बोलताच सभेचा नुरच बदलून गेला. कार्यकर्त्यांना जोश आला. घोषणाबाजी सुरू झाली. जमलेला जनसमुदाय भावनिक झाला. आपला नेता आपला विचार करतोय ही भावना सर्वांनाच उत्साहीत करणारी ठरली. दरम्यान रोहित पवार यांनी अंगात पिवळ्या रंगाचा शर्ट तर खांद्यावर घोंगडी व डोक्याला  गुडाळलेला पंचा तसेच फेटा असा केलेला पेहराव लक्षवेधी ठरला. त्यांच्या या धनगरी पेहरावातून अप्रत्यक्षपणे राम शिंदे यांना इशारा देण्याचाच प्रयत्न पवारांकडून झाल्याचे बोलले जात आहे.

Video : रोहित पवारांचा सवाल, कोल्हापूरचे चंद्रकांतदादा पुण्यातून निवडणूक लढवू शकतात,  मग मी कर्जत – जामखेडमधून का नाही ?

दरम्यान, दुपारच्या सभेनंतर कर्जत तहसिल कार्यालयात रोहित पवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पवार कुटूंबातील महत्वाचे सदस्य तसेच आघाडीतील घटक पक्षांचे सर्व नेते उपस्थित होते. प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी रोहीत पवारांचा उमेदवारी अर्ज स्विकारला. यावेळी तहसिलदार विशाल नाईकवाडे उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी