30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeसिनेमाअक्षयकुमार महिलेच्या अवतारात

अक्षयकुमार महिलेच्या अवतारात

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : अभिनेता अक्षयकुमारने आपल्या ट्विटरवरून एक फोटो प्रदर्शित केला आहे. या फोटोमध्ये तो साडीमध्ये दिसत आहे. देवीच्या मूर्तीसमोर संतप्त अवतारातील एक महिला उभी आहे. अक्षयला महिलेच्या रूपात पाहून त्याच्या चाहत्यांनी संमीश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अक्षयने हा फोटो त्याच्या आगामी ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित केला आहे. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर देवीला नमन करून हा फोटो मी प्रदर्शित करीत असल्याचे अक्षयने म्हटले आहे. मी उत्साहात आहे, अन् काहीसा नाराजही आहे, असेही अक्षयने त्याच्या ट्विटमध्ये नमूद केले आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब’मध्ये अक्षयसोबत कायरा अडवाणी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा हॉरर चित्रपट आहे. दक्षिणात्य चित्रपटाचा तो रिमेक आहे.

अक्षयच्या प्रत्येक चित्रपटात काहितरी आगळेवेगळे असते. त्याची भूमिकाही प्रेक्षकांवर प्रभाव टाकत असते. त्यामुळे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी