28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeटॉप न्यूजसलूनमध्ये केस कापताना आठ वर्षांच्या मुलीसोबत अश्लील चाळे; एकाला अटक

सलूनमध्ये केस कापताना आठ वर्षांच्या मुलीसोबत अश्लील चाळे; एकाला अटक

टीम लय भारी

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड मध्ये एका आठ वर्षीय मुलीचे केस कापताना केशकर्तनकाराने अश्लील कृत्य केल्याची घटना घडलीय. चिमुकलीचे केस कापणाऱ्या व्यक्तीने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी केशकर्तनकाराला चिखली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत(Salon.. Man arrested for having obscene things with eight-year-old girl).

मोहम्मद शेबु मोहम्मद हानिफ सलमानी असं आरोपीचे नाव असून तो ‘थ्री स्टार’ नावाच्या सलूनमध्ये काम करत होता असं पोलिसांनी सांगितले आहे.

शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींची फाशीची शिक्षा रद्द!

संतापजनक: ‘तो’ व्हिडीओ पतीला दाखवेल अशी धमकी देत आतेभावाचा बहिणीवर अत्याचार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ वर्षीय मुलगी आपल्या आजीसोबत चिखली परिसरातील सलूनमध्ये हेअर कट करण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपीने या मुलीला हेअर कट करण्यासाठी खुर्चीत बसवले. हेअर कट करत असताना आरोपीने मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत अश्लील कृत्य केल्याचं पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

चित्रा वाघ यांचा पोलीस खात्याला उलट सवाल

Mangaluru: 8-year-old girl gangraped and killed, 4 arrested

हेअर कट झाल्यानंतर मुलगी आजीसोबत घरी आली, तेव्हा तिने घडलेला प्रकार आई आणि आजीला सांगितला. पीडित मुलीच्या आईने चिखली पोलीस ठाणे गाठत केशकर्तनकाराविरोधात तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत अशी माहिती पोलीस अधिकारी वसंत बाबर यांनी दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक डी. एस. मुंडकर करत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी