33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeटॉप न्यूजनेटीजन्सच्या दबावापुढे झुकरबर्ग ही झुकला

नेटीजन्सच्या दबावापुढे झुकरबर्ग ही झुकला

  • अतुल माने, ज्येष्ठ पत्रकार

शेती आणि शेतकरी उद्धवस्त करणारे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी नवी दिल्लीच्या वेशीवर गेली 22 दिवस आंदोलनास बसलेल्या शेतकऱ्यांना पाठींबा देताना नेटीजन्सच्या दबावापुढे फेसबुकने झुकून (shamefacebook) किसान एकता मोर्चाचे फेसबुक पेज पुन्हा सुरू केले आहे.

शेतकरी आंदोलनाला दिवसेंदिवस मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून हे आंदोलन समाज माध्यमातून आणखी पसरू नये या साठी विविध क्लुप्त्या सरकार कडून करण्यात येत आहेत. यासाठी सुरुवातीला इंटरनेट सुविधा खंडित करण्यात आली होती. तसेच काही पोर्टल आणि संकेत स्थळावर बंदी घालण्यात आली. याचाच एक मोठा भाग म्हणून किसान एकता मोर्चाने सुरू केलेल्या फेसबुक पेजवर फेसबुक ने बंदी घातली होती. कम्युनिटी स्टँडर्ड व्हायोलन्स चे कारण देत ही बंदी घालण्यात आली. पण याचा उलटा परिणाम पाहावयास मिळाला. त्यामुळे शेतकरी आंदोलनास पाठींबा देणाऱ्या समाजातील सर्वच स्तरातून नेटीजन्स नी फेसबुक ने घेतलेल्या या निर्णयाचा जोरदार निषेध #shamefacebook या नावाने करत मार्क झुकरबर्ग यांनाही टॅग केले. अमेरिकेत असलेल्या काही शीख तरुणांनी याबाबत मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तसेच नवीन राष्ट्राध्यक्ष जो बायडेंन यांना मेल पाठविले. तसेच समाजमाध्यमातून त्याबाबत आवाज उठविण्यात आला.

नेटीजन्स च्या या वाढत्या दबावापुढे झुकत अखेर फेसबुक ने किसान विकास मोर्चाचे बंद केलेले फेसबुक पेज अखेर सुरू केले. दरम्यान या शेतकरी आंदोलनाने आता पंजाब आणि हरयाणा येथील गावागावात मोठा परिणाम करण्यास सुरुवात केली आहे. अनेक गावांत असलेले जिओ चे मोबाईल टॉवर्स आता खाली उतरविण्यास सुरुवात झाली आहे. तर अनेक ठिकाणी असलेले रिलायन्स मार्ट बंद करण्याचा दबाव वाढत आहे. रिलायन्स च्या बहिष्काराला आता गावागावात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी