28 C
Mumbai
Saturday, July 6, 2024
Homeटॉप न्यूजAir India : १८ हजार कोटींचा व्यवहार, २७०० कोटी कॅश; पाहा Air...

Air India : १८ हजार कोटींचा व्यवहार, २७०० कोटी कॅश; पाहा Air India साठी टाटा-मोदी सरकारमध्ये अशी झाली डील

टीम लय भारी

नवी दिल्ली: ‘एअर इंडिया’ला अखेर नवीन मालक मिळाला आहे. सरकारच्या मालकीची ही विमान कंपनी खरेदीसाठी टाटा समूहाने लावलेली बोली केंद्रातील मोदी सरकारने स्वीकारली आहे. यासंदर्भातील माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयातील निर्गुतवणूक विभाग म्हणजेच ‘दिपम’चे सचिव असणाऱ्या तुहिन कांता पांडे यांनी दिली आहे (Tata-Modi government deals worth Rs 18,000 crore).

सरकारला या व्यवहारामधून १२ हजार ९०३ कोटींची अपेक्षा असताना टाटांनी १८ हजार कोटींना ही कंपनी विकत घेण्याची तयारी दर्शवली असून कंपनीवरील सर्व कर्जही टाटाच फेडणार आहेत. सरकार आणि टाटांमधील या करारासंदर्भातील महत्वाची माहिती पांडे यांनी दिल्याचं पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटलंय.

प्रविण दरेकरांचे नवाब मलिकांवर टीकास्त्र

महाबळेश्वर येथील दोन घोडेचालकां विरोधात गुन्हा दाखल

या व्यवहारामधील अटी आणि शर्थींसंदर्भातील माहिती ‘दिपम’च्या सचिवांनी दिली आहे. टाटांनी १८ हजार कोटींची बोली लावली होती. ज्यामध्ये १५ हजार ३०० कोटींच्या कर्जाचाही समावेश आहे. हे कर्ज वगळता बाकी रक्कम टाटा कंपनी रोख देणार आहे.

टाटा सन्सला एअर इंडिया या ब्रॅण्डमध्ये तसेच लोगोमध्ये पुढील पाच वर्षे कोणतेही बदल करता येणार नाही. तसेच पाच वर्षांनंतर काही हस्तांतरण करायचे झाल्यास ते भारतीय व्यक्तीच्याच नावे करावं लागणार आहे अशी अट घालण्यात आलीय.

‘मंत्रालयात बदल्या, जमिनींच्या व्यवहारात करोडोंची उलाढाल’

Maharashtra: Jewellery firm MD arrested, 3 offices attached for duping investors of at least Rs 8 crore

टाटांना पुढील एका वर्षासाठी एअर इंडियाच्या सर्व कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करता येणार नाही. त्यानंतर दुसऱ्या वर्षापासून ते कर्मचाऱ्यांना व्हीआरएसच्या माध्यमातून कंपनीमधून कमी करु शकतात, असं सांगण्यात आलंय.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी