28 C
Mumbai
Wednesday, June 26, 2024
Homeटॉप न्यूजTECNO SPARK 8 नवीन रॅम व्हेरिएंट भारतात लाँच, किंमत ११,००० रुपयांपेक्षाही कमी!

TECNO SPARK 8 नवीन रॅम व्हेरिएंट भारतात लाँच, किंमत ११,००० रुपयांपेक्षाही कमी!

टीम लय भारी

टेक्‍नो या जागतिक प्रिमिअम स्‍मार्टफोन ब्रॅण्‍डने आज त्‍यांच्‍या लोकप्रिय स्‍पार्क सिरीजअंतर्गत नवीन व्‍हेरिएण्‍ट ‘स्‍पार्क ८’ लाँच केला. ४+६४ जीबी स्‍टोरेज क्षमता असलेल्‍या या व्‍हेरिएण्‍टमध्‍ये विभागातील अग्रणी फीचर्स आहेत आणि या व्‍हेरिएण्‍टची किंमत १०,९९९ रूपये आहे(TECNO SPARK 8 new RAM variant launched in India)

१६ मेगापिक्‍सल एआय ड्युअल रिअर हाय-रिझॉल्‍युशन कॅमेरा, सर्वोत्तम व्‍युईंगसाठी ६.५६ इंच डिस्‍प्‍लेसह २६९ पीपीआय स्क्रिन पिक्‍सल डेन्सिटी आणि शक्तिशाली हेलिओ जी२५ प्रोसेसर व सुधारित इंडियन लँग्‍वेज सपोर्ट अशा सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांनी युक्‍त स्‍पार्क ८ स्मार्टफोन डिझाइन करण्‍यात आला आहे.

थंडीत प्या हॉट लसणाचं सूप

पेटीएम वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी

जलद व सुलभ गेमिंग अनुभवासाठी विभागातील अग्रणी ६.५६ इंच एचडी+ डिस्‍प्‍लेसह १२० हर्टझ टच रिस्‍पॉन्‍स रेट आहे. टेक्‍नोची स्‍पार्क सिरीज किफायतशीर विभागामध्‍ये उच्‍च दर्जाचा कॅमेरा, डिस्‍प्‍ले आणि सर्वसमावेशक स्‍मार्टफोन अनुभवासाठी ओळखली जाते. नवीन व्‍हेरिएण्‍टमध्‍ये सुधारित इंडियन लँग्‍वेज सपोर्ट वैशिष्‍ट्य देखील आहे, ज्‍यामुळे ग्राहक त्‍यांच्‍या स्‍वत:च्‍या स्‍थानिक भाषेमध्‍ये संवाद साधू शकता.

 नवीन स्‍मार्टफोन अॅटलांटिक ब्‍ल्‍यू, टॉर्कोइज सियान व आयरिस पर्पल या तीन नवीन आकर्षक रंगांमध्‍ये येतो.

Jio Phone Next : रिलायन्स डिजिटलवर सेल सुरू; जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स

Tecno Spark 8 launched in India; Specs, price and availability

स्‍पार्क ८ ४ जीबी व्‍हेरिएण्‍टमध्‍ये विशाल ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. ही बॅटरी जवळपास ६५ दिवसांपर्यंत व्‍यापक स्‍टॅण्‍डबाय टाइम, ३० तासांचे कॉलिंग, १७ तासांचे वेब ब्राऊजिंग, १४ तासांचे म्‍युझिक प्‍लेबॅक आणि २४ तासांचा व्हिडीओ प्‍लेबॅक देते. तसेच स्‍पार्क ८ मध्‍ये डिटीएस साऊंड वैशिष्‍ट्य आहे, जे स्‍मार्टफोनची साऊंड क्‍वॉलिटी अधिक सुधारते.

टेक्नो स्पार्क ८ वर ऑफर

ग्राहकांना TECNO SPARK 8 च्या खरेदीवर मोफत वायरलेस इअरफोन्स मिळतील. त्याची किंमत ७९९ रुपये आहे. यासोबतच स्क्रीन बदलण्याची योजनाही दिली जाणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी