31 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeटॉप न्यूजपेटीएम वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी

पेटीएम वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी

टीम लय भारी

मुंबई: पेटीएम आपल्या वापरकर्त्यांसाठी नेहमी नवीन रिचार्ज ऑफर घेऊन येत असतो. पेटीएमवर ग्राहकांना मोबाईल रिचार्ज, डीटीएच रिचार्ज, पेटीएम अॅपद्वारे बिल पेमेंटवर सुमारे 20 टक्के त्वरित सूट मिळणार आहे. ही विशेष ऑफर पेटीएम पेमेंट्स बँकेच्या व्हिसा डेबिट कार्ड धारकांसाठी आहे. पेटीएम पेमेंट्स बँक आपल्या वापरकर्त्यांना व्हिसा आणि रुपे डेबिट कार्ड जारी करते. पेटीएम एक डिजिटल पेमेंट आणि वित्तीय सेवा कंपनी आहे (Paytm users for There is good news).

जर तुम्ही पेटीएम अॅपद्वारे 48 किंवा त्याहून अधिक रुपयांचे मोबाईल रिचार्ज केले तर तुम्हाला 10 रुपयांची सूट मिळणार आहे. ऑफरचा लाभ घेण्यासाठी वापरकर्त्यांना कोणताही प्रोमोकोड टाकण्याची गरज नाही. मात्र, यासाठी ग्राहकांना पेटीएम पेमेंट्स बँकेच्या व्हिसा कार्डद्वारे पैसे द्यावे लागतील. मोबाईल रिचार्ज व्यतिरिक्त डीटीएच रिचार्ज, वीजबिल आणि गॅस बुकिंगवरही अशाच ऑफर चालू आहेत.

‘या’ अॅपमध्ये येणार नवीन अपडेट; जाणून घ्या कोणत्या अॅपवर कोणते अपडेट येणार

टाइप न करता व्हॉट्सअँपवरून पाठवू शकता मेसेज

Paytm users for There is good news
पेटीएम रिचार्जवर 10 टक्के सूट

मोबाईल रिचार्ज ऑफर – किमान 48 रुपयांच्या मोबाईल रिचार्जवर 10 रुपये त्वरित सूट
डीटीएच रिचार्ज ऑफर- किमान 100 रुपयांच्या डीटीएच रिचार्जवर 10 % त्वरित सूट
वीजबिल ऑफर- किमान 500 रुपयांच्या वीजबिलावर 10% झटपट सूट (कमाल सवलत- 100 रुपये)
गॅस बुकिंग ऑफर – किमान 500 रुपयांच्या गॅस बुकिंगवर 50 रुपये त्वरित सूट

मुकेश अंबानी आणणार जगातील सर्वात स्वस्त फोन

Twist In Paytm IPO: Ex Director Wants To Stop Rs 15,000 Crore IPO, Claims 55% Share In Paytm

पेटीएम अॅपसह मोबाईल रिचार्ज कसे करावे?

1. तुमचे पेटीएम अॅप उघडा.
2. यानंतर ऑल सर्व्हिस वर क्लिक करा.
3. आता तुम्हाला रिचार्ज आणि पे बिलवर जावे लागेल आणि मोबाईल प्रीपेडवर क्लिक करावे लागेल. अॅपच्या मुख्य पेजवर रिचार्ज आणि पे बिलचा पर्याय आहे.
4. आता मोबाईल नंबर टाका. यानंतर सेवा प्रदाता आणि मंडळ निवडावे लागेल.
5. यानंतर रिचार्जची रक्कम टाकावी लागेल.
6. यानंतर तुम्हाला पेमेंट करावे लागेल (How to recharge mobile with Paytm app).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी