28 C
Mumbai
Monday, July 8, 2024
Homeटॉप न्यूजआश्विन मुद्गल, श्वेता सिंघल, सुनील चव्हाण यांच्यासह आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

आश्विन मुद्गल, श्वेता सिंघल, सुनील चव्हाण यांच्यासह आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

टीम लय भारी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा सुरूच ठेवला आहे. आज आणखी आठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यांत आश्विन मुद़गल, श्वेता सिंघल, सुनील चव्हाण, नयना गुंडे आदिंचा समावेश आहे.

बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांची नावे

(1) श्री अरिबम शर्मा उपसचिव ग्रामविकास यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली

(2) श्री अश्विन मुदगल यांची नियुक्ती सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, नवी मुंबई या रिक्त पदावर

(3) श्री पी. सिवा संकर यांची नियुक्ती अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, पुणे या रिक्त पदावर

(4) श्री सुनील चव्हाण यांची नियुक्ती सह-व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, औरंगाबाद या रिक्त पदावर

(5) श्रीमती श्वेता सिंघल यांची नियुक्ती प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई या रिक्त पदावर

(6) श्रीमती नयना गुंडे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादित, पुणे यांची नियुक्ती उपमहासंचालक, यशदा, पुणे या रिक्त पदावर

(7) श्री आर. एस. जगताप यांची नियुक्ती सह आयुक्त. विक्रीकर, औरंगाबाद या रिक्त पदावर

(8) श्री ए. ए. गुल्हाणे यांची नियुक्ती प्रकल्प व्यवस्थापक, जलस्वराज्य, (2) नवी मुंबई या रिक्त पदावर

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी