30 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeटॉप न्यूजबोगस मतदारांना बसणार चाप! मतदान कार्ड लवकरच होणार आधारशी लिंक

बोगस मतदारांना बसणार चाप! मतदान कार्ड लवकरच होणार आधारशी लिंक

टीम लय भारी

 नवी दिल्ली :   सरकारनं मतदान कार्ड आधार कार्डशी जोडण्याचा विडा उचललाय. अगोदर बोगस सबसिडीधारक, राशनदार यांचा पदार्फाश केला आता सरकार कार्यकर्त्यांच्या मुळावर उठलया. करेक्ट कार्यक्रम लागला ना भौ. खरे मतदार किती आणि खोटे मतदान किती याची अख्खी कुंडली सरकारच्या हाती येणार हाय(Voting cards will be linked to Aadhaar soon)

आजून फारशा प्रतिक्रिया आल्या नसल्या तरी हा निर्णय निवडणुकीतील वातावरण तापवणार हे सांगायला ज्योतिषी कशाला पाहिजे.

शीना बोरा जिवंत असून काश्मीरमध्ये आहे, इंद्राणी मुखर्जीचा धक्कादायक दावा

मनसेचा आणखी एक तारा निखळला !

निवडणूक आयोगाच्या निर्णयाला हिरवा कंदील

केंद्रीय निवडणूक आयोगाने सुधारणा विधेयक सरकारकडे पाठविले होते. त्यावर कायदे व न्याय विभागाने गेल्यावर्षी काम केले. यंदा ऑगस्ट महिन्यात केंद्रीय कायदा व न्यायमंत्री किरेन रिजिजू यांनी निवडणूक आयोगाच्या प्रस्तावावर सरकार गंभीर असल्याचे सूचित केले होते.

त्यानंतर या ड्राफ्टला मंजुरी देण्यात आली. यामध्ये तरुण मतदार नोंदणीसाठी वर्षभरात चार ड्राईव्ह करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबरपासून 18 वर्ष पूर्ण झालेल्या नवमतदारांच्या नोंदणीची सोय झाली आहे.  इतर ही काही सुधारणांना मंजुरी देण्यात आली आहे. 2019 साली आयोगाने आधार कार्डसोबत वोटर आयडी अर्थात मतदान ओळखपत्र जोडण्याची दुरस्ती सुचवली होती.

रेल्वेने बदलले ऑनलाइन तिकिट बुकिंगचे नियम,

You can link Aadhaar to voter ID card by SMS or Phone

त्यामुळे अनेक ठिकाणी बोगस मतदान करणा-या मतदारांना चाप बसणार होता तसेच बोगस मतदार याद्यांचं ही पितळ उघडं पडणार होतं.  हा प्रस्ताव तीन वर्षांपासून धूळ खात पडला होता. 2015 सालीच निवडणूक आयोगाने राष्ट्रीय निवडणूक कायद्या शुद्धिकरण आणि पडताळा कार्यक्रम सुरु केला होता.

मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानंतर हा कार्यक्रम थांबविण्यात आला होता. आताही केंद्र सरकारने या बिलाला मंजुरी देताना आधार कार्डसोबत मतदान कार्डची ओळख संपूर्णतः ऐच्छिक ठेवली आहे. तरीही त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होईल यात शंका नाही.

काय होतील परिणाम

आधार कार्ड-मतदान कार्ड जोडणीमुळे बोगस मतदार संख्या समोर येईल

एकाच व्यक्तीच्या नावावरील दोन-तीन ठिकाणी असलेली नोंदणी समोर येईल

बोगस मतदार याद्या समोर येण्याची शक्यता आहे.

घुसखोरांचा डाटा समोर येईल.

सर्वात महत्वाचे म्हणजे मतदारांची खरी आकडेवारी समोर येईल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी