29 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeटॉप न्यूजयशवंत ब्रिगेडच्या वतीने धनगर समाजाच्या मागण्यांसाठी शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची घेतली भेट

यशवंत ब्रिगेडच्या वतीने धनगर समाजाच्या मागण्यांसाठी शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची घेतली भेट

टीम लय भारी

मुंबई: मुंबई राजभवन येथे यशवंत ब्रिगेड च्या वतीने धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची धनगर समाजाचे अनुसूचित जमाती (ST) अंमलबजावणी साठी व धनगर समाजाच्या प्रलंबित मागण्या संदर्भात विस्तृत  भेट घेऊन चर्चा केली आहे.(Yashwant Brigade, the delegation met the Governor)

हा विषय राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या अखत्यारीत असल्यामुळे मा. राज्यपाल महोदयांनी राष्ट्रपती यांच्याशी चर्चा करून चर्चा करून महाराष्ट्राच्या यादीतील क्रमांक ३६ वर धनगर जमातीचा समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली. सोबत धनगर समाजाच्या आरक्षणाची अमलबजावणी करावी.

गेली अनेक वर्षे धनगर समाजाचा अनुसूचित जमातीचा आरक्षणाचा प्रश्न रखडलेला आहे त्यामुळे धनगर समाजाचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकास  खुंटला आहे त्यामुळे समाजाचे नुकसान झाले आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाला मिळणाऱ्या योजनांना कात्री लावली आहे. त्याचा योग्य तो पाठपुरावा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

ठाकरे सरकारने धनगरांच्या तोंडावर बोळा फिरवला आहे : गोपीचंद पडळकर

Dhangar Reservation : …अन्यथा चौकाचौकात पंतप्रधानांचे पुतळे जाळू; धनगर समाज आक्रमक

‘धनगरांनी भाजपच्या आंदोलनात सहभागी होऊ नये’

Maharashtra: BJP leader Padalkar demands budgetary provision for Dhangar community

त्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी- मेंढी विकास महामंडळाला एक हजार कोटी चा निधी मिळावा, महाराजा यशवंतराव होळकर यांचे वाफगाव येथील स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे, फिरस्ती मेंढी पालनामधे नैसर्गिक आपत्ती बचावासाठी आधुनिक दर्जाचे तंबू वितरण योजना व शेळी मेंढी यांच्यावर उपचार व लासिकरणासाठी सुसज्ज मोबाईल हॉस्पिटल व तसेच शेळी मेंढी व मेंढपाळांसाठी एकत्रित विमा योजना उतरवा, अशी मागण्या केली आहे.

Yashwant Brigade, the delegation met the Governor

तसेच महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसामुळे  हजारो शेळ्या मेंढ्या दगवल्या असून त्याची तत्काळ नुकसान भरपाई मिळावी व मागील सरकारने जे आदिवासींना ते धनगरांना या धर्तीवर २२ योजना, व एक कोटींची तरतूद केली होती. परंतु महाराष्ट्र सरकारने लागू केल्या नाहीत. त्या तत्काळ लागू कराव्यात.

या मागण्यांसाठी आज धनगर समाजाच्या, यशवंत ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष बापुराव सोलनकर, धनगर समाज महिला एकता परिषदेच्या अध्यक्षा सौ नीहारिका ताई खोंदले, वसंतराव शेळके, संपतराव टकले, वसंतराव घुले, चंद्रकांत वाघमोडे, या शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेतली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी