31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयमंत्री होऊ पाहणाऱ्या भाजप नेत्याला हवेत पीएस, ओएसडी

मंत्री होऊ पाहणाऱ्या भाजप नेत्याला हवेत पीएस, ओएसडी

टीम लय भारी

मुंबई : भाजपप्रणीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार दोनच दिवसांपूर्वी सत्तेत आले आहे. भाजप व शिंदे गटातील कोणाला मंत्रीपदे मिळणार याची यादी अद्याप जाहीर झालेली नाही. पण आपल्याला मंत्रीपद मिळणार असल्याची आतली माहिती काही आमदारांनी काढली असून पुढील पाऊले टाकायलाही सुरूवात केली आहे.

माण – खटाव मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांनाही मंत्रीपद मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मंत्रीपद मिळणार म्हटल्यानंतर मंत्रालयात देखणे दालन, व अलिशान बंगलासुद्धा मिळणार हे ओघाने आलेच. मंत्री कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही गरज भासणार. त्यासाठी गोरे यांनी ‘चांगल्या’ अधिकाऱ्यांचा शोध सुरू केला आहे.

कृषी, जलसंधारण, रोजगार हमी योजना यापैकी एखादे खाते जयकुमार गोरे यांना मिळण्याची शक्यता आहे. त्यांनी स्वतःच तसे काही अधिकाऱ्यांकडे बोलून दाखविले आहे. मला चांगले खासगी सचिव (पीएस), विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) हवे आहेत, असे गोरे यांनी काही अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
अधिकारी वर्ग सुद्धा हुशार असतो. कोणत्याही मंत्र्यांकडे पीएस म्हणून रूजू होण्यापूर्वी त्याची ते माहिती घेत असतात.

मंत्र्यांच्या गरजा, छंद, सवयी अधिकाऱ्यांनाच पूर्ण कराव्या लागतात. त्यानुसार एखाद्या मंत्र्यांच्या कार्यालयात जायचे किंवा नाही जायचे हे अधिकारी ठरवित असतात. त्यानुसार काही अधिकाऱ्यांनी जयकुमार गोरे यांचा स्वभाव, त्यांच्या सवयी याबाबत चौकशी करण्यास सुरूवात केली आहे. जयकुमार गोरे यांचा आडदांड स्वभाव लक्षात घेता कोणताही सभ्य व सरळमार्गी अधिकारी त्यांच्या कार्यालयात काम करण्यास धजावणार नाही, असे सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.

जयकुमार गोरे यांचे सर्वोच्च न्यायालयात प्रकरण, १३ जुलै रोजी सुनावणी

जयकुमार गोरे यांच्यावर महिनाभरापूर्वी ॲट्रॉसिटीचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा इतका गंभीर आहे की, मुंबई उच्च न्यायालयानेही त्यांचा अटकपूर्ण जामीन फेटाळला आहे. त्यावर गोरे यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. या अपिलावर आज सुनावणी झाली. पुढील सुनावणी येत्या १३ जुलै रोजी ठेवण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा :

Jaykumar Gore : तहसिलदाराच्या निलंबनासाठी आक्रमक झालेल्या आमदार जयकुमार गोरे यांनी मायणी वैद्यकीय महाविद्यालयाचाही भ्रष्टाचार विधानसभेत मांडावा !

भाजप आमदारावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा; उच्च न्यायालयाने नाकारला आहे जामीन, तरीही मंत्रीपदासाठी लॉबिंग !

भयानक : मटणाचे चोचले पुरविले नाही म्हणून मुलाने वृद्ध बापाची केली हत्या, सातारा जिल्ह्यातील संतापजनक प्रकार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी