28 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीयउध्दव ठाकरेंनी जाता जाता घेतले ‘लोकहिताचे‘ महत्वपूर्ण निर्णय

उध्दव ठाकरेंनी जाता जाता घेतले ‘लोकहिताचे‘ महत्वपूर्ण निर्णय

टीम लय भारीः

मुंबई : सरकार अस्थिर झालेले असतांना देखील अनेक प्रलंबित निर्णयावर आजच्या बैठकीत निर्णय घेण्यात आले. इतके दिवस अडकून पडलेल्या महत्वाच्या निणर्यांचा मार्ग मोकळा झाला. उध्दव ठाकरेंनी जाताजाता लोकहिताचे निर्णय घेतल्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षांवर केला जात आहे.

अनेक दिवसांपासून भाजपची औरंगाबादचे संभाजीनगर करा अशी मागणी होती. आज औरंगाबादचे नाव संभाजी नगर करण्यास तसेच उस्मानाबाद शहराचे नाव धाराशीव करण्यास सामान्य प्रशासनने मान्यता दिली. नवी मुंबई विमानतळाचे नाव लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील अंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यास नगरविकास विभागाने मान्यता दिली. तसेच राज्य हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करणार असा निर्णय घेण्यात आला.

हिंगोली जिल्हयात बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्र हे नाव देण्यास कृषी विभागाने मान्यता दिली आहे. अहमदनगर जिल्हयातील कर्जत येथे दिवाणी न्यायाधीश न्यायालय स्थापन करण्यास विधि व न्याय विभागाने मान्यता दिली. इतर मागास बहुजन कल्याण विभागाने ग्रामीण भागातील मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबवण्यास मान्यता दिली आहे.

तसेच विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ व उर्वरित विकास मंडळे ही पुनर्गठीत करण्याचा निर्णय नियोजन विभागाने घेतला आहे. निवड झालेल्या परंतु मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती न मिळालेल्या एसईबीसी उमेदवारांकरिता अधिसंख्या पदे मंजूर करण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला. तसेच महसूल विभागाने शासन अधिसुचना 8 मार्च 2019 अनुसार आकारावयाच्या अधिमुल्यांची रक्कम भरण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्यास मान्यता दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे अनेक प्रलंबित प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता आहे.

हे सुध्दा वाचा:

आदित्य ठाकरेंच्या तंबीनंतर बंडखोर आमदारांनी विधान भवनाकडे येण्याचा मार्ग बदलला

पुण्याला जिजाऊ नगर, शिवडी न्हावा शेवा मार्गाला ‘अंतुलेंचे‘ नाव देण्याची काॅंग्रेसची मागणी

उस्मानाबादी शेळी पालन बक्कळ पैसे कमवण्याचे साधन

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी