33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमुंबईआदित्य ठाकरेंच्या तंबीनंतर बंडखोर आमदारांनी विधान भवनाकडे येण्याचा मार्ग बदलला

आदित्य ठाकरेंच्या तंबीनंतर बंडखोर आमदारांनी विधान भवनाकडे येण्याचा मार्ग बदलला

टीम लय भारी

मुंबई : एकनाथ शिंदे आणि त्यांना समर्थन देणाऱ्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने आणि मोर्चे निघाले. बंडखोर आमदारांच्या कार्यालयांची शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून शिवसैनिकांचे मेळावे घेण्यात आले. या मेळाव्यांमधून आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना फैलावर घेतले. त्यांची कान उघाडणी करत त्यांचा खरपूस समाचार घेतला.

फ्लोर टेस्ट तर होणारच आहे. ज्या दिवशी फ्लोर टेस्ट होईल त्यादिवशी मुंबईत उतरतील. विमानतळावरुन विधानभवनात जाण्याचे रस्ते आपल्या वरळीतून आहेत. वरळी नाहीतर आपल्या परळमधून आहेत. त्यावेळी शिवसैनिकांनी त्यांचा समाचार घ्यावा, इतकेच नाही तर याची जबाबदारी महिला आघाडीने घ्यावी. बंडखोरांना महिला आघाडीने धडा शिकवावा, असेही अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरे धमकीवजा शब्दात बोलले होते. बाळासाहेबांनी किंवा दिघे साहेबांनी समजावलं असतं तसं समजवण्याची जबाबदारी ही महिला आघाडीने घेतली आहे, असा इशाराही आदित्य ठाकरेंनी दिला होता.

दरम्यान, आता एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेच्या या धमकीनंतर थेट मुंबईत येण्याऐवजी गोव्याला जाण्याचा मार्ग निवडला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या तंबीनंतर ते गोव्यावरून मुंबईला विमानाने येण्याऐवजी जहाजाने येतात का? असा प्रश्न लोकांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे. हास्याची बाब म्हणजे एकनाथ शिंदे हे गुवाहाटीवरून मुंबईला येण्याआधी गोव्याला गेल्याने लोकांकडून सोशल मीडियावर याबाबतचे मिम्स देखील शेअर करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा :

उस्मानाबादी शेळी पालन बक्कळ पैसे कमवण्याचे साधन

वसंतराव नाईकांपासून ते शरद पवारापर्यंत प्रत्येक मराठी नेत्याने शिवसेनेला मोठे का केले?

कलम 370 हटवूनही ‘अमरनाथ‘ यात्रेवर संकटाची टांगती तलवार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी