33 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeशिक्षणशालेय विद्यार्थ्यांना रस्त्यावर आणू नका,वर्षा गायकवाड यांचं आवाहन

शालेय विद्यार्थ्यांना रस्त्यावर आणू नका,वर्षा गायकवाड यांचं आवाहन

टीम लय भारी
मुंबई:- राज्यात अनेक ठिकाणी दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे विकास पाठक उर्फ ‘हिंदुस्थानी भाऊ’ चे नाव अनेक आंदोलक विद्यार्थांकडून घेण्यात आले आहे.(Varsha Gaikwad appeals Don’t bring children on the streets)

दहावी, बारावीची परीक्षा ऑनलाईन पद्‍धतीने घ्‍या, अशी मागणी करत आज दुपारी राज्‍याच्‍या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्‍या निवासस्‍थानासमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.

हे सुद्धा वाचा

ऑफलाईन परीक्षांना विद्यार्थ्यांचा विरोध , राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन

महाराष्ट्र सरकारचा सोमवारपासून शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळेत प्रवेश देताना उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची अट रद्द करावी : धनंजय तानले

Parents in two minds as schools ready to reopen in TN

यानंतर अवघ्‍या काही मिनिटांमध्‍ये मुंबईसह नागपूर, ओरंगाबाद, उस्‍मानाबाद येथे विद्‍यार्थी रस्‍त्‍यावर उतरले. अचानक झालेल्‍या आंदोलनामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. मुलांना भडकावून त्यांना रस्त्यावर आणू नये, काही सूचना करायची असेल तर ती राज्य सरकारशी करावी असं आवाहन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.

“काही मुलांची मागणी ऑनलाइन परीक्षा घेण्याची आहे, तर काहींची मागणी ऑफलाइन परीक्षा घ्या, अशी आहे. महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे परीक्षा घेण्यात अडचणी येत आहेत. महाराष्ट्रात १०वी आणि १२वीच्या परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३० लाखांपेक्षा जास्त आहे.

 राज्यभर एकाच दिवशी एकाच वेळी परीक्षा घेतली जाते. राज्यातील आदिवासी भागात आणि खेडेगावात लोक राहतात. गेल्या दोन वर्षात करोनामुळे बरीच परिस्थिती बदलली आहे. विद्यार्थ्यांवर देखील करोना आणि परीक्षा असं दुहेरी टेन्शन आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही परीक्षेचा वेळ वाढवण्यासारखे निर्णय घेत आहोत,” असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

“विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी दूर जावं लागू नये, यासाठी ते शिकत असलेल्या शाळांमध्ये परीक्षा घेण्यासाठी आमचे प्रयत्न सूरू आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत आम्हाला कोणतीही रिस्क घ्यायची नाही, त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आम्ही विचार करतोय, तज्ज्ञांशी चर्चा करतोय,” असं वर्ष गायकवाड यांनी सांगितलं. तसेच “आज झालेल्या मोर्चानंतर मी त्यांच्या संघटनेच्या प्रमुखांशी बातचीत केली. त्यांना मी चर्चेसाठी बोलावलंय. त्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेऊ. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही चर्चा करू. १०वी आणि १२वीच्या परीक्षा लवकर घेण्याचा आमचा मानस आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या पुढील वर्गातील प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडणार नाहीत,” असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, दहावी बारावी बोर्ड परीक्षा एक महिनाभर आलेली असताना दहावी बारावी बोर्ड परीक्षा नेमकी वेळापत्रकानुसार होणार की लांबणीवर जाणार? याबाबत सध्यातरी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने वेळापत्रकानुसारच होईल असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी