29 C
Mumbai
Saturday, December 3, 2022
घरव्हिडीओVIDEO : आदित्य ठाकरेंनी घेतले फोर्टच्या राजाचे दर्शन

VIDEO : आदित्य ठाकरेंनी घेतले फोर्टच्या राजाचे दर्शन

आज दुपारी शिवसेनेचे युवा नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी फोर्टच्या राजाचे दर्शन घेतले. आजची फोर्टच्या राजाची दुपारची आरती आदित्य ठाकरेंच्या हस्ते करण्यात आली. अदित्य ठाकरेंनी बाप्पाची विधीवत पूजा के‍ली आणि बाप्पाचे अशीर्वाद घेतले. दरवर्षी या गणपतीच्या दर्शनाला नेते मंडळी हजेरी लावतात. मात्र मागच्या दोन वर्षामध्ये कोरोना महामारीमुळे गणेशोत्सवावर बंधने आली होती. त्यामुळे या वर्षी सगळे जण गणेशोत्सवाचा आनंद घेत आहेत.
आदित्य ठाकरे यांनी आज चंदन वाडी, कुलाबा तसेच फोर्टच्या राजाचे दर्शन घेतले. आज दुपारी आदित्य ठाकरे यांनी फोर्टच्या राजाची दुपारची आरती केली. दुपारी दीडच्या सुमारास ते फोर्टच्या राजाच्या दर्शनाला पोहोचले. यावेळी आदित्य ठाकरेंनी बाप्पाची विधीवत पूजा केली. त्यानंतर, गणपतीला श्रीफळ अर्पण केले. प्रसाद अर्पण केला. त्यानंतर आरती केली. गुरुजींनी देखील त्यांना बाप्पाचा प्रसाद दिला. दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील फोर्टच्या राजाची मुर्ती अतिषय देखणी आणि आकर्षक आहे. तसेच साजवट देखील डोळे दिपवून टाकणारी आहे. दुपारच्या वेळी गणपतीच्या दर्शनाला गर्दी नसल्याने भाविकांना मोकळे पणाने दर्शन घेता आले. शिवाय पावसाने उघडीप दिल्याने या वर्षी भाविकांना दर्शन घेतांना कोणतीही अडचण होत नाही.

नवेली कांबळे
नवेली कांबळेhttp://laybhari.in
Naveli Kamble is a reporter/ sub editor.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!