30 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeव्हिडीओVIDEO : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावर अजित पवार यांचा एकनाथ शिंदे यांना सल्ला

VIDEO : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावर अजित पवार यांचा एकनाथ शिंदे यांना सल्ला

महाराष्ट्र सरकारने सीमप्रश्नी बैठक घेतल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आक्रमक झाले. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई स्वतः कोर्टात गेले व त्यांनी कर्नाटक सरकारकडून प्रख्यात वकील रोहतगी यांची नियुक्ती केली. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने हरीश साळवे यांची वकील म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न पुन्हा उग्र झाला आहे. महाराष्ट्र सरकारने सीमप्रश्नी बैठक घेतल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आक्रमक झाले. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई स्वतः कोर्टात गेले व त्यांनी कर्नाटक सरकारकडून प्रख्यात वकील रोहतगी यांची नियुक्ती केली. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने हरीश साळवे यांची वकील म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. ज्यावेळी आघाडीचे सरकार होते. त्यावेळीही ह्या खटला सुरू होत्या. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी हरिश साळवे यांची नियुक्ती केली होती. हरिश साळवे यांना या सर्व प्रकरणाची माहिती आहे. सुप्रीम कोर्टात पहिल्या पाच वकिलांमध्ये हरीश साळवे यांचे नाव प्रथम क्रमांकावर आहे. त्यामुळे तत्क्षणी मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्र सरकारच्या वतीने हरिश साळवे यांची नियुक्त करावी, अशी आग्रही मागणी अजित पवारांनी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी