25 C
Mumbai
Thursday, February 22, 2024
Homeराजकीयउदयनराजे भोसले इतके हतबल झालेले मी गेल्या ५० वर्षात पहिल्यांदा पाहतोय :...

उदयनराजे भोसले इतके हतबल झालेले मी गेल्या ५० वर्षात पहिल्यांदा पाहतोय : अनिल गोटे

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दरबारात जाऊन दाताच्या कण्या केल्या तरी दिल्लीश्वर राज्यपालांची हकालपट्टी करत नाहीत, हेच खरे सत्य आहे. हाच पुरावा आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दरबारात जाऊन दाताच्या कण्या केल्या तरी दिल्लीश्वर राज्यपालांची हकालपट्टी करत नाहीत, हेच खरे सत्य आहे. हाच पुरावा आहे. अन्यथा राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर राज्यपाल बदलणे एवढी कठिण गोष्ट नाही. उदयनराजे भोसले इतके हतबल झालेले मी गेल्या ५० वर्षात पहिल्यांदा पाहतोय! त्यामुळे माझी सर्वच नेत्यांना विनंती आहे की, महाराष्ट्राच्या भाजपच्या नेत्यांना तरी छत्रपती आपले वाटतात का ? हा खरा प्रश्न निर्माण होतो, असा घणाघात राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे केला.
अनिल गोटे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्राची स्थापना झाल्या पासून आजतागायत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचा इतका कधीही आणि कुणीही अपमान करण्याचे धाडस केले नाही. ३५० वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली तेव्हा पासून शिवाजी महाराजांबददल गुजराथ्यांच्या मनामध्ये एक अढी आहे. शिवाजी महाराजांबद्दल वेळेवाकडे बोलले की, तर त्यांचा अंहकार सुखावतो. ही वस्तुस्थिती आहे म्हणुनच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी शाह आणि शहेनशाह यांच्या दिल्ली दरबारात जाऊन किती ही दाताच्या कण्या केल्या तरी दिल्लीश्वर राज्यपालाची हाकलपट्टी करीत नाहीत. हेच खरे सत्य आहे. हाच याचा पुरावा आहे. अन्यथा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अथवा उपमुख्यमत्र्यांनी सांगिल्यानंतर एक राज्यपात बदलणे एवढी कठीण गोष्ट नाही.
हे सुद्धा वाचा

‘संजय राऊत यांचे तोंड म्हणजे कपडे सुकविण्याचे बॉयलर’
उदयनराजे भाजप नेत्यांना म्हणाले, तुम्हाला लाज वाटत नाही का ?
मंदिरांमध्ये मोबाईल फोनवर बंदी!
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपनेते आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या शिवरायांवरील वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेताना अनिल गोटे यांनी म्हटले आहे की, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे नियुक्तीपासूनच वादग्रस्त ठरले आहेत, त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य करून महाराष्ट्राचे आदर्श व युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांनी वेळोवेळी ठरवून अपमान केला आहे. आता तर भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आणि मंत्री मगंलप्रसाद लोढा यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची तुलना औरंगजेब बादशाह बरोबर केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना छत्रपती शिवरायांबरोबर केली. परंतु विषयाचे गांभिर्य लक्षात घेउन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वत: खुलासा केला की, शिवाजी महाराजांची तुलना कुणाबरोबर होऊ शकत नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी