29 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeव्हिडीओVIDEO : भीमा कोरेगाव जय स्तंभ पाडण्याची भाषा करणाऱ्यांबाबत काय म्हणाले डॉ....

VIDEO : भीमा कोरेगाव जय स्तंभ पाडण्याची भाषा करणाऱ्यांबाबत काय म्हणाले डॉ. संग्राम पाटील

भीमा कोरेगाव विजयाची चिरंतन स्मृती असलेला जय स्तंभ स्तंभ पाडण्याची भाषा करणारे आणि समाजात अशांतता पसरवणारे लोक म्हणजे विकृत मनोवृत्ती आहे. त्यांना जास्त महत्त्व देण्याची गरज नाही. मात्र, यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे, असे डॉ. संग्राम पाटील यांनी म्हटले आहे.

भीमा कोरेगाव विजयाची चिरंतन स्मृती असलेला जय स्तंभ पाडण्याबाबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहे. त्याला डॉक्टर संग्राम पाटील यांनी व्हिडिओ शेअर करून उत्तर दिले आहे. त्यांनी भीमा कोरेगावच्या इतिहासाबाबत माहिती दिली आहे. जय स्तंभ पाडण्याची भाषा करणारे आणि समाजात अशांतता पसरवणारे हे असे लोक म्हणजे विकृत मनोवृत्ती आहे. त्यांना जास्त महत्त्व देण्याची गरज नाही. मात्र, यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे, असे डॉ. संग्राम पाटील यांनी म्हटले आहे. मनूवादी वृत्तीची, सत्तेत असलेली काही मंडळी समाजात दुही माजवण्याचे काम पूर्वीही करत होते आणि आताही करत आहेत. आपण आपला खरा इतिहास वाचला पाहिजे, तो जाणून घेतला पाहिजे, असे देखील डॉ. पाटील यांनी म्हटले आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी