28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeव्हिडीओVIDEO : सरकारला थोडी लाज असेल तर राज्यपालांना परत पाठवा

VIDEO : सरकारला थोडी लाज असेल तर राज्यपालांना परत पाठवा

सत्ताधारी पक्षाने राज्यपालांना रोखायला हवे मात्र राज्यपालांवर नियंत्रण नसल्याचे वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी आरोप देखील केले. सीमा प्रश्नाचा मुद्दा देखील सध्या पेटला आहे. मात्र सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षांना सातत्याने कसे दाबायचे याचाच प्रयत्न करत आहे.

महाविकास आघाडीने मुंबईत नुकताच महामोर्चा काढला होता. गेले काही महिने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी जी महापुरूषांबद्दल वादग्रस्त विधाने करत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये असंतोष आहे. सत्ताधारी पक्षाने राज्यपालांना रोखायला हवे मात्र राज्यपालांवर नियंत्रण नसल्याचे वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी आरोप देखील केले. सीमा प्रश्नाचा मुद्दा देखील सध्या पेटला आहे. मात्र सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षांना सातत्याने कसे दाबायचे याचाच प्रयत्न करत आहे. मुंबईतील मोर्चावरुन सरकारला कळालेच असेल की लोकांमध्ये किती असंतोष आहे. एकंदरीत सध्या असे दिसत आहे की लोकशाही प्रक्रीयाच नष्ट करण्याचे कारस्थान सुरू आहे. काही दिवसांपूर्वी फ्रॅक्चर्ड फ्रिडम पुस्तकावरुन वाद झाला. सरकार ज्या पूस्तकाला पुरस्कार देते तोच पुरस्कार सरकार परत घेते. समितीमधील सदस्य, अध्यक्षांची विचारपूस न करता एक मंत्री हा निर्णय घेतो आणि समिती बर्खास्त केली जाते. यावरुन लोकशाही मुल्ये पायदळी तुडविण्याचे काम सत्ताधारी करत असल्याचे दिसते असे डाव्या चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते सुबोध मोरे म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी