35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeव्हिडीओशरद पवारांनी सांगितले, गांधी - नेहरू यांचे महात्म्य

शरद पवारांनी सांगितले, गांधी – नेहरू यांचे महात्म्य

'गांधी - नेहरू यांनी देशाचं खरंच नुकसान केलं का ?' या नावाने 'लय भारी'ने नुकताच एक विशेषांक प्रसिद्ध केला आहे. या अंकात राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, पत्रकारीता इत्यादी क्षेत्रातील ४५ पेक्षा जास्त नामवंत मान्यवरांनी लेख लिहिले आहेत. यांत शरद पवार, राजदीप सरदेसाई, भाऊ तोरसेकर, श्रीराम पवार, यशवंतराव गडाख, तुषार गांधी, राजू परूळेकर, प्रा. एन. जी. राजूरकर, कुमार सप्तर्षी, अशोक चौसाळकर, संजय आवटे, श्रीमंत माने, राजेंद्र साठे, अतुल भातखळकर, माधव भांडारी, आशिष शेलार, विजय वडेट्टीवार, सत्यजित तांबे, चंद्रकांत दळवी, प्रभाकर देशमुख, प्रसाद काथे, बंधुराज लोणे, प्रमोद चुंचूवार, रफिक मुल्ला, प्रफुल्ल फडके, राजन वेळूकर, नाना पटोले, उल्हास पवार, , विश्वास काश्यप, राज कुलकर्णी, राजेश खरात आदींचा समावेश आहे. या अंकातील निवडक लेख आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. हा विशेषांक खरेदी करण्यासाठी संपादक श्री. तुषार खरात यांच्याशी ९८२१२८८६२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

ज्येष्ठ नेते श्री. शरद पवार यांनी महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू यांची महती सांगणारा लेख लिहिला आहे. या लेखात श्री. पवार म्हणतात, दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर गांधीजींनी लगेच भारतीय राजकारणात उडी घेतली नाही. त्यांनी भारताची भ्रमंती केली. सामाजिक, सेवाभावी आणि आध्यात्मिक कार्यात लक्ष घातले. त्यामुळे ते नेमस्त आणि जहालांपासून समानांतर राहिले.
सूत उभे आणि आडवे जोडल्याशिवाय वस्त्र तयार होत नाही हे गांधीजींना चांगलेच अवगत होते. हा प्रयोग त्यांनी देश जोडण्यासाठी केला. १९४७ मध्ये देश भारत म्हणून स्वतंत्र झाला. गांधीजी खऱ्या अर्थाने राष्ट्राचे जनक  झाले. भारत-पाकिस्तान अशी फाळणी झाली तरी भारत एका सूत्रात बांधणाऱ्या निर्मिकाला नुकसानकर्ता म्हणणे हे पाप आहे.

हे सुद्धा वाचा

विश्वगुरू होण्यासाठी गांधी-नेहरूंची बदनामी; पूर्वार्ध (शरद पवार यांचा विशेष लेख

महात्मा गांधींचे विचार लोकांपर्यंत पोचविण्यासाठी जगावेगळे वाचनालय चालविणारा समाजसेवक
श्री. शरद पवार पुढे म्हणतात की, सध्या महात्मा गांधींच्या मारेकऱ्यांचे गोडवे गाणाऱ्या कडव्या घटकांनी पुन्हा डोके वर काढले आहे. एकीकडे नथुराम गोडसेचा जयजयकार होत असताना महात्मा गांधींविरूद्ध उघड भूमिका घ्यायला मात्र सत्तास्थानातील शक्ती कचरतात.
नेहरूंविषयी श्री. पवार म्हणतात, नेहरूंनी धर्मसत्ता आणि राजसत्ता वेगळ्या ठेवल्या, राष्ट्र निधर्मवादी केले ही पोटदुखी कडव्या, जातीयवादी शक्तींमध्ये आहे. नेहरू इतिहास, समाजशास्त्राचे गाढे अभ्यासक होते. धर्मसत्तेचा अंकुश राजसत्तेवर राहिला तर ते राज्य अधोगतीकडे जाते हे त्यांनी जाणले होते.
शरद पवार यांनी या लेखात नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता टीका केली आहे. काहींना विश्वगुरू व्हायचे आहे. नेहरूंसारख्या विश्वात वंद्य असणाऱ्या व्यक्तीला इतिहासातून आणि नव्या पिढीच्या नजरेतून नामशेष केल्याशिवाय त्यांना स्वतंत्र भारतातील मीच सर्वात प्रभावी आणि मोठे नेतृत्व असल्याचा दावा करता येणार नाही.
श्री. शरद पवार यांचा हा लेख ‘लय भारी’ने प्रसिद्ध केलेल्या ‘गांधी – नेहरू यांनी देशाचं खरंच नुकसान केलं का ?’ या विशेषांकात प्रसिद्ध झाला आहे. हा अंक खरेदी करण्यासाठी आपण संपादक श्री. तुषार खरात यांच्याशी ९८२१२८८६२२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी