32 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeमहाराष्ट्र'आता मरोस्तोवर हटत नाही...'

‘आता मरोस्तोवर हटत नाही…’

आरक्षण मिळालेच पाहीजे, याच तारखेला मिळायला हवे, असा हट्ट करू नका. संविधानाचा आदर करा. गतीने काम होण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. आपण संविधानाप्रमाणे वागले पाहीजे, असे विधान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले होते. या विधानाचाही जरांगे पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलाच घाम फोडला आहे. राज्यभरातील मराठा समाज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. जरांगे पाटील यांनी निर्वाणीचे आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाच्या अनुषंगाने जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठवाड्यातून निघालेली पदयात्रा उग्र रूप धारण करू लागली आहे. हे माझे शेवटचे आंदोलन आहे. आता मुंबईला जाणार आणि आरक्षण घेवूनच परत येणार. मरोस्तोवर मी हटणार नाही. हे शेवटचे आंदोलन आहे, अशी भावनिक साद जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला घातली आहे. येत्या २६ जानेवारी रोजी जास्तीत मराठा समाजाने मुंबईत आंदोलनासाठी यावे. मुंबईच्या गल्लीतही मराठा आंदोलन दिसले पाहीजे. सर्व बांधवांनी २६ जानेवारी रोजी आझाद मैदानात आंदोलनासाठी यावे. ज्यांना शक्य नाही, त्यांनी गावात राहून आंदोलन करावे. गावात राहून सुद्धा आंदोलन झाले पाहीजे, असेही आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा

मनोज जरांगेंच्या कुटुंबाची कुणबी नोंद सापडली

कोणाची जमीन खाल्ली, बंगले हाडपले, मला शांत राहू दे, मनोज जरांगेंचा भुजबळांवर एकेरी उल्लेख

अंतरवाली सराटी ते मुंबई आझाद मैदानावर मनोज जरांगे-पाटील यांची पायी दिंडी
आंदोलन फोडण्यासाठी सत्ताधारी नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. पण संपूर्ण मराठा समाजाचा माझ्यावर विश्वास आहे. सत्ताधाऱ्यांसोबत यापूर्वी लाईव्ह चर्चा झालेली आहे. हे संपूर्ण समाजाला माहित आहे. त्यामुळे कितीही अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला तरी त्यात सत्ताधाऱ्यांना यश येणार नाही, अशा शब्दांत जरांगे पाटील यांनी ठणकावले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे. मराठा समाजातून अधिकारी घडले पाहीजेत, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

जरांगे पाटील यांची नगरमध्ये सभा

जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील पदयात्रा मुंबईच्या दिशेने निघाली आहे. आज नगरमध्ये या पदयात्रेचे आगमन झाले आहे. नगरमध्ये जरांगे यांची जंगी सभा होणार आहे. या सभेच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तब्बल १२५० पोलिस शिपायांची कुमक तैनात करण्यात आली आहे.

अजितदादांना सुनावले

आरक्षण मिळालेच पाहीजे, याच तारखेला मिळायला हवे, असा हट्ट करू नका. संविधानाचा आदर करा. गतीने काम होण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. आपण संविधानाप्रमाणे वागले पाहीजे, असे विधान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले होते. या विधानाचाही जरांगे पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. संविधानाप्रमाणे सत्ताधारी वागत नसल्याकडे जरांगे पाटील यांनी लक्ष वेधले आहे. कुणबी नोंदी सापडल्यानंतर आरक्षण द्यायला हवे असे संविधानाने सांगितलेले आहे. तरीही आरक्षण का दिले जात नाही, असा सवाल जरांगे यांनी केला आहे.
नेत्यांनी जबाबदारीने वक्तव्य केले पाहीजे. सत्ता येते, अन् सत्ता जाते. परंतु एखादा नेता मनात बसला तर मनातून जात नाही, याकडेही जरांगे यांनी लक्ष वेधले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी