29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रमहात्मा गांधींचे विचार लोकांपर्यंत पोचविण्यासाठी 'जगावेगळे' वाचनालय चालविणारा समाजसेवक

महात्मा गांधींचे विचार लोकांपर्यंत पोचविण्यासाठी ‘जगावेगळे’ वाचनालय चालविणारा समाजसेवक

सातारा जिल्ह्याला मराठ्यांची राजधानी म्हणून इतिहासकाळात ओळखले जायचे. सातारा जिल्ह्यामध्ये अनेक साहित्यिक आणि नाटककारांनी आपल्या साताऱ्याचा नावलौकिक केला आहे. याच सातारा जिल्ह्यातील-माण खटाव तालुक्यातील बुध गावातील जीवन इंगळे (Jeevan Ingle) यांनी गेली बारा वर्षांपासून फिरते वाचनालय (Firate vachnalay) सुरू केलं आहे. असं वाचनालय या महाराष्ट्रात कधीही कुठेही पाहायला मिळालं नसेल. भोंदूगिरी वगळता आध्यात्म, वैज्ञानिक असे अनेक पुस्तकं आपल्या फिरत्या वाचनालयातून वाचकांपर्यंत घेऊन जाण्याचं काम करत आहेत. ‘वाचाल तर वाचाल’ हे अनेकदा ऐकलं असेल मात्र त्याचा अवलंब कोणी करत नाही. आपल्या फिरत्या वाचनालयात गांधींची पुस्तकं आणि नथुराम गोडसेंची (Nathuram Godse) पुस्तकं ठेवणारा अवलिया सध्या चर्चेत आहे. (gandhi)

फिरते वाचनालय हे इंगळे यांनी गेली बारा वर्षांआधी सुरू केलं होतं ते आजही सुरू आहे. एवढंच नाही तर एका साध्या सायकलवरून ज्ञान वाटत फिरणारे इंगळे यांनी महात्मा गांधी वाचत असताना नथुराम गोडसे वाचनाऱ्यांनी महात्मा गांधी वाचावे असे आवाहन केलं आहे. मला महात्मा गांधी आवडतात, मी त्यांच्या विचारांची जोपासना करत असल्याचे इंगळे माध्यमांशी बोलताना म्हणाले. ज्याला नथुराम गोडसे वाचायचे आहेत त्याने ते वाचावं. आपल्याकडे सर्व पुस्तकं आहेत. यावेळी त्यांनी आपल्या फिरत्या वाचनालयामागील किस्सा सांगितला.

ज्यावेळीस सायकल हातामध्ये आली त्यावेळी मला इतरत्र ठिकाणी भटकंती करावी लागत असायची त्यावेळी मी ती पुस्तकं घेऊन फिरायचो असं ते म्हणाले. हळू हळू बुध परिसरामध्ये आमच्या गावात तसेच भागामध्ये रस्त्याने, बांधाने सायकल जाऊ लागली. सुरूवातीला साने गुरूजींचे श्यामची आई हे पुस्तक हाताळले तेव्हा घरोघरी जाऊन त्यांनी मुलांच्या संस्कारांच्या जडणघडणीला हातभार लावला. श्यामची आई या पुस्तकामुळे लहान मुलांमध्ये इंगळे वावरू लागले. त्यानंतर काही शाळांमध्ये जाऊ लागले. माझं तेवढं शिक्षणही नाही असं म्हणत त्यांनी आपल्या सामाजिक कार्याच्या सुरूवातीबद्दल सांगितलं आहे. तेवढं शिक्षणही नाही मात्र जसजसं वाचत गेलो तसं मला त्यातून मिळत गेलं, असं ते म्हणाले.

हे ही वाचा

ट्रक चालकांच्या आंदोलनाचे पडसाद राज्यभर, पेट्रोल पंपाबाहेर वाहनचालकांची तोबा गर्दी

अब्दुल सत्तार यांच्यावर ईडीची तक्रार होईना, ईडी कार्यालयाबाहेर केक कापत तक्रारदराने केला निषेध

‘देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून गुन्हेगारीत वाढ’

सर्वोदय सामाजिक संस्था अंतर्गत, ‘फिरते वाचनालय’

इंगळे यांचे वडिल हे स्वातंत्र सेनानी असून विनोबा भावेंच्या चळवळीत होते. अशातच इंगळे याचं वय हे ६७ वर्षे असलं तरीही ते अजूनही वाचनाबाबतचं भान आपल्या फिरत्या वाचनालयाच्या माध्यमातून सामाजापुढं मांडत आहेत. फिरते वाचनालय हे सर्वोदय सामाजिक संस्था अंतर्गत आहे. यामध्ये अडीच हजाराहून पुस्तकं आहेत. सर्वोदय संस्थेची स्थापना ही २००९ ते १० दरम्यान झाली.

मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यामध्ये देखील इंगळे एका खेडेगावात जात वाचनाचे महत्त्व पटवून देत आहेत. ते स्वत:साठी न वाचता लहान मुलांसाठी, महिलांसाठी, अध्यात्मिक लोकांसाठी, गरोदर महिलांसाठी वाचत असल्याचं ते म्हणाले आहेत. वाचनाने आपण प्रगल्भ होतो, ज्ञान मिळतं, आपल्याला जग कळतं इंटरनेटच्या जमान्यामध्ये आपण जग जिंकायला निघालो आहे, असं देखील ते म्हणाले. यावेळीस बोलत असताना त्यांनी देशातील तरूणांचा गांधी-नेहरूंबद्दल द्वेश निर्माण होण्याबाबत सांगिलं आहे.

‘गांधी नेहरूंबद्दल द्वेश निर्माण केला जातोय’

देशामध्ये सध्या तरूणांच्या मनावर हिंदुत्त्ववादी विचारसरणी बिंबवली जात आहे. यामुळे देशातील जवळजवळ २५ टक्के तरूण हे हिंदुत्त्ववादी विचारसरणीचे असल्याचं ते म्हणाले आहेत. मात्र असं असलं तरीही देशातील ७५ टक्के तरूण असा विचार करत नाही. हिंदुवादी विचार तरूणांच्या मनामध्ये बिंबवल्याने आता गांधी नेहरूंबद्दल द्वेश निर्माण केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. बाबीसी मराठीशी बोलत असताना त्यांनी आपल्या एकूण १२ वर्षांपासून सुरू असलेले फिरते वाचनालय, गांधी-नेहरू विषयावर तसेच वाचनाचे महत्त्व पटवून दिलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी