30 C
Mumbai
Monday, September 11, 2023
घरव्हिडीओVIDEO : प्रथमेश परब अडकणार लग्नाच्या बेडीत ?

VIDEO : प्रथमेश परब अडकणार लग्नाच्या बेडीत ?

अभिनेता प्रथमेश परब हा लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे ? सध्या सोशल मीडियावर त्याच्या लग्नाची चर्चा जोरदार चालू आहे. 'आमचं ठरलं आहे, लग्नाला यायचं हं... पत्रिका गुरुवारी पाठवतोय.' अशी एक पोस्ट सोशल मीडियावर त्याने शेयर केली आहे.

टाइमपास चित्रपटातील दगडूच्या भूमिकेने घराघरांत पोहचलेला अभिनेता प्रथमेश परब हा लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे ? सध्या सोशल मीडियावर त्याच्या लग्नाची चर्चा जोरदार चालू आहे. ‘आमचं ठरलं आहे, लग्नाला यायचं हं… पत्रिका गुरुवारी पाठवतोय.’ अशी एक पोस्ट सोशल मीडियावर त्याने शेयर केली आहे. मात्र पोस्टच्या या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. मग नेमका मामला काय तर प्रथमेश खऱ्या आयुष्यात नव्हे तर मोठ्या पडद्यावरील ‘ढिशक्यांव’ या चित्रपटात तो बोहल्यावर चढताना पाह्यला मिळणार आहे. याचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टर मध्ये प्रथमेश मुंडावळ्या बांधून, नवरा बनून त्याच्या बायकोसोबत पाहायला मिळतोय मात्र या पोस्टरमध्ये प्रथमेशच्या बायकोच्या हातात बंदूक असून ती बंदूक तिने प्रथमेशवर रोखून धरलेली आहे . त्यामुळे या चित्रपटात नेमके काय काय घडते हे आता १० फेब्रुवारी २०२३ ला प्रेक्षकांना पाह्यला मिळणार आहे.
चित्रपटाची कथा लेखक संजय नवगिरे यांची असून दिग्दर्शक प्रितम एस के पाटील दिग्दर्शित ‘ढिशक्यांव” हा चित्रपट निर्माते महोम्मद देशमुख, उमेश विठ्ठल मोहळकर आणि प्रितम एसके पाटील यांनी निर्मित केला आहे. तर चित्रपटात प्रथमेश परब सोबत संदीप पाठक, अहेमद देशमुख, सुरेश विश्वकर्मा, मेघा शिंदे, प्रणव पिंपळकर, राजीव पाटील, सिद्धेश्वर झाडबुके, आसावरी नितीन, प्रसाद खैरे, साक्षी तोंडे, महेश घाग, मधु कुलकर्णी, बादशाह शेख, अमित दुधाने, शिव माने, विनया डोंगरे, हर्ष राजपूत, सोमनाथ गिरी यांच्या देखील भूमिका आहेत.
येत्या १० फेब्रुवारी २०२३ ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी